New Zealand A Tour Of India : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) टीम इंडिया (Team India) दमदार कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे 'न्यूझीलंड ए' (New Zealand-A) संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. भारत ए (India A) आणि न्यूझीलंड ए संघात तीन चार दिवसीय आणि तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण या मालिकेपूर्वीच भारत ए संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारत ए संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला असून तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय ए संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त झाला आहे. प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) पाठदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्या मालिकेत खेळू शकणार नाही. प्रसिद्ध कृष्णाने अगदी कमी कालावधीत भारतीय संघात आपली छाप उमटवली आहे.
1 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात
भारत ए आणि न्यूझीलंड ए संघात 1 सप्टेंबरपासून चार दिवसीय सामन्याला सुरुवात झाली. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान हा सामना खेळवला जातोय. तर दुसरा चार दिवसीय सामना 8 ते 11 सप्टेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. बंगळुरुमध्ये हे सामना खेळवले जात आहेत. यानंतर 22 सप्टेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.
प्रसिद्ध कृष्णाची कारकिर्द
26 वर्षांच्या प्रसिद्ध कृष्णाने 2021 मध्ये इंग्लंडविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. प्रसिद्ध कृष्णा टीम इंडियासाठी आतापर्यंत 12 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड आणि वेस्टइंडिज दौऱ्यात प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघात होता.
भारत ए संघ
प्रियांक पांचाल (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, रुतुराज गायकवाड़, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, केएस भरत (विकेटकीपर), उपेंद्र यादव (विकेटकीपर), कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चाहर, प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक, मुकेश कुमार, यश दयाल, अर्जन नागवासवाला.