नॉर्थ साऊंड : महिलांच्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर फेकला गेलाय. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडनं भारतानं ठेवलेलं ११२ धावांचं आव्हान अवघ्या २ बळींच्या मोबदल्यात पार केलं. याविजयसह इंग्लंडनं महिला संघान भारताला 8 विकेट्सनी दणदणीत मात देत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. यामुळे पहिल्यांदाच भारताचं विश्वचषक फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न तुटलंय. भारताची खेळी 19.3 ओव्हरमध्ये केवळ 112 रन्समध्येच संपली. याला उत्तर देताना एमी जॉंस(51 नाबाद) आणि नताली स्किवर( 50 नाबाद) च्या शानदार बॅटींगच्या जोरावर इंग्लंडने 18 बॉल्स आणि 8 विकेट्स राखून हे लक्ष्य पार केलं.
आता फायनलमध्ये इंग्लंडचा संघ टीम ऑस्ट्रेलियाशी भिडेल, ज्यांनी यजमान वेस्ट इंडिज संघाला 71 रन्सनी मात दिलीयं.
भारताने टॉस जिंकून पहिली बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. स्मृति ने तानिया भाटिसा(11) सोबत पहिल्या विकेटसाठी 43 रन्सची भागीदारी केली. स्मृति मंधाना (34) चा विकेट घेत सोफी एक्लेस्टोनने भारताला पहिला झटका दिला. तिने 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 34 रन्स केले.
India's spirited campaign in the ICC #WT20 comes to an end. England win the 2nd semi-final by 8 wickets and they will meet Australia in the final.
Details - https://t.co/bnYQfktsLG pic.twitter.com/jaj3Canvjl— BCCI Women (@BCCIWomen) November 23, 2018
हीथर नाइटने भाटियाला आपली शिकार बनवलं. त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जने खेळ पुढे नले. 26 रन्सवर असताना दुसरा रन्स घेण्याच्या नादात जेमिना आऊट झाली.
क्रिस्टी गार्डनने एका ओव्हरमध्ये भारताला दोन झटके दिले. तिने पहिल्या बॉलवर वेदा कृष्णमूर्ति (2) ला विकेटकिपर जोंसकडे कॅच द्यायला भाग पाडल. हरमनप्रीतकडून मोठ्या खेळाची आशा असताना 16 रन्स करून बॅकवर्ड पॉईंटला कॅच देत ती आऊट झाली.
क्रिस्टीने हेमलता आणि अनुजा पाटीलला देखील आऊट केलं. राधा यादव रन आऊट झाली तर अरूंधति रेड्डीला एक्लेस्टोनने बाहेरचा रस्ता दाखवला.
दीप्ती शर्मा रन आऊट झाल्यानंतर भारताचा डाव 19.3 ओव्हरमध्ये 112 वर संपला. नाइटने 9 रन्सवर 3 विकेट घेतले तर गार्डन आणि एक्लेस्टोनने 2-2 विकेट घेतले.