IPL 2019 Auction: टीमनी कायम ठेवलेले आणि सोडलेले खेळाडू

२०१९ सालच्या आयपीएलसाठी मंगळवार १८ डिसेंबरला जयपूरमध्ये लिलाव होणार आहे.

Updated: Dec 17, 2018, 08:13 PM IST
IPL 2019 Auction: टीमनी कायम ठेवलेले आणि सोडलेले खेळाडू title=

जयपूर : २०१९ सालच्या आयपीएलसाठी मंगळवार १८ डिसेंबरला जयपूरमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक टीमनी त्यांची रणनिती ठरवली आहे. आयपीएलच्या आठही टीमनी मागच्यावर्षी त्यांच्याकडे असलेले काही खेळाडू सोडून दिले आहेत, तर अनेक खेळाडू टीममध्ये कायम ठेवले आहेत. काही टीमनी तर दुसऱ्या टीमसोबत खेळाडूंची अदलाबदली केली आहे. या सगळ्यामुळे प्रत्येक टीमकडे लिलावासाठी ठराविक रक्कम शिल्लक आहे. मंगळवारी होणाऱ्या लिलावामध्ये टीमना एवढीच रक्कम वापरता येणार आहे. आयपीएलच्या सगळ्या टीमनी कोणते खेळाडू सोडले, कोणते कायम ठेवले आणि या टीमकडे किती रक्कम शिल्लक आहे, यावर नजर टाकूयात.

मुंबई

मुंबईच्या टीमनं त्यांचा कर्णधार रोहित शर्माला धरून १८ खेळाडू कायम ठेवले आहेत. तर १० खेळाडूंना मुंबईच्या टीमनं सोडून दिलं आहे. मागच्यावर्षी बंगळुरूकडून खेळलेला क्विंटन डी कॉकला मुंबईनं विकत घेतलं. आता लिलावामध्ये मुंबईची टीम ६ भारतीय आणि १ परदेशी खेळाडू विकत घेऊ शकते.

लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम: ११.१५ कोटी रुपये

मुंबईनं कायम ठेवलेले खेळाडू

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ

मुंबईनं सोडलेले खेळाडू

सौरभ तिवारी, प्रदीप सांगवान, मोहसीन शेख, एमडी निधीश, शरद लुंबा, तेजींदर सिंग ढिल्लोन, जेपी ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजुर रहमान, अकिला धनंजया

राजस्थान

मागच्या वर्षी ११.५ कोटी रुपये मोजून विकत घेतलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थानच्या टीमनं सोडून दिलं आहे. राजस्थानच्या टीमकडे आता लिलावात वापरण्यासाठी २०.९५ कोटी रुपये शिल्लक आहेत. राजस्थानची टीम लिलावात ६ भारतीय आणि ३ परदेशी असे एकूण ९ खेळाडू घेऊ शकते. 

राजस्थाननं कायम ठेवलेले खेळाडू 

अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमन बिर्ला, एस मिधून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिनी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महीपाल लोमरोर, जॉस बटलर, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर, इश सोधी

राजस्थाननं सोडलेले खेळाडू

डार्सी शॉर्ट, बेन लॉफलिन, हेनरिच क्लासीन, डेन पॅटरसन, झहीर खान, दुशमंता चमीरा, जयदेव उनाडकट, अनुरीत सिंग, अंकित शर्मा, जतीन सक्सेना

चेन्नई

चेन्नईच्या टीमनं यावर्षी फक्त ३ खेळाडूंना सोडून दिलं आहे. त्यामुळे आता लिलावामध्ये चेन्नईच्या टीमला ८.४० कोटी रुपयेच वापरता येणार आहेत. या लिलावात चेन्नईला २ भारतीय खेळाडूच विकत घेता येतील. परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झाल्यामुळे त्यांना या खेळाडूंवर बोली लावता येणार नाही.

चेन्नईनं कायम ठेवलेले खेळाडू

एमएस धोनी, सुरेश रैना, फॅप डुप्लेसिस, मुरली विजय, शेन वॉटसन, रवींद्र जडेजा, मिचेल सॅण्टनर, डेव्हिड विली, ड्वॅन ब्राव्हो, केदार जाधव, अंबाती रायुडू, सॅम बिलिंग्ज, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असीफ, लुंगी एनगीडी, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोनु कुमार, चैतन्य बिष्णोई

चेन्नईनं सोडलेले खेळाडू

मार्क वूड, कनिष्क सेठ, क्षितीज शर्मा

दिल्ली

१२व्या आयपीएलआधी दिल्लीच्या टीमनं मोठे बदल केले. दिल्लीनं हैदराबादकडून शिखर धवनला विकत घेतलं. तर अनेक दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला. लिलावासाठी दिल्लीकडे आता २५.५० कोटी रुपये उपलब्ध आहेत. या लिलावात दिल्ली ७ भारतीय आणि ३ परदेशी खेळाडू विकत घेऊ शकतात.

दिल्लीनं दिलेले खेळाडू

शिखर धवनच्या बदल्यात दिल्लीनं हैदराबादला विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज नदीम हे खेळाडू दिले.

दिल्लीनं कायम ठेवलेले खेळाडू

श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, मनजोत कार्ला, कॉलीन मुन्रो, क्रिस मॉरीस, जयंत यादव, राहुल तेवटिया, हर्षल पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, ट्रेन्ट बोल्ट, संदीप लमिचने, अवेश खान

दिल्लीनं सोडलेले खेळाडू

गौतम गंभीर, जेसन रॉय, गुरकीरत मान, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, डॅन ख्रिश्चन, सयान घोष, लियाम प्लंकेट, ज्युनिअर डाला, नमन ओझा

कोलकाता

कोलकात्याची टीम या लिलावामध्ये १५.२० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वापरू शकते. या पैशांमध्ये कोलकाता ७ भारतीय आणि ५ परदेशी असे एकूण १२ खेळाडूंना खरेदी करु शकेल.

कोलकत्यानं कायम ठेवलेले खेळाडू

दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शिवम मावी, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागकोटी, प्रसिद्ध कृष्णा

कोलकत्यानं सोडलेले खेळाडू

मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन, टॉम कुरान, कॅमरून डेलपोर्ट, जॅव्हन सिअरल्स, इशांक जग्गी, अपूर्व वानखेडे, विनय कुमार

बंगळुरू

बंगळुरूच्या टीमनं क्विंटन डीकॉकच्या बदल्यात मुंबईकडून २.८ कोटी रुपये घेतले. याचबरोबर त्यांनी मार्कस स्टॉयनिसला पंजाबच्या टीमकडून घेतलं. तर क्विंटन डीकॉकसोबत मंदीप सिंगला दुसऱ्या टीमला देऊन टाकलं. बंगळुरूची टीम या लिलावात १८.१५ कोटी रुपये वापरू शकते. या पैशांमध्ये त्यांना ८ भारतीय आणि २ परदेशी खेळाडू विकत घेता येतील.

बंगळुरूनं कायम ठेवलेले खेळाडू

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोम, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, टीम साउदी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेरोलिया, नाथन कूल्टर-नाइल

बंगळुरूनं सोडलेले खेळाडू

ब्रेंडन मॅकुलम, ख्रिस वोक्स, कोरे अँडरसन, सरफराज खान

हैदराबाद

आयपीएलच्या लिलावामध्ये हैदराबादची टीम ९.७० कोटी रुपये खर्च करू शकते. यामध्ये त्यांना ३ भारतीय आणि २ परदेशी खेळाडू विकत घेता येऊ शकतील. हैदराबादनं शिखर धवनला दिल्लीला दिल्याच्या बदल्यात त्यांच्याकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज नदीमला टीममध्ये घेतलं.

हैदराबादनं कायम ठेवलेले खेळाडू

डेव्हिड वॉर्नर, युसुफ पठाण, रशीद खान, शाकिब अल हसन, बिली स्टॅनलेक, केन विल्यमसन, मोहम्मद नबी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, टी नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, तुलसी थांपी, दीपक हुड्डा

हैदराबादनं सोडलेले खेळाडू 

सचिन बेबी, तन्मय अग्रवाल, रिद्धिमान साहा, ख्रिस जॉर्डन, कार्लोस ब्रॅथवाइट, अॅलेक्स हेल्स, बिप्ल शर्मा, सय्यद मेहदी हसन

पंजाब

पंजाबच्या टीमनं लिलावाआधी सर्वाधिक बदल केले आहेत. त्यामुळे लिलावात पंजाब ३६.२० कोटी रुपये वापरू शकतं. या किंमतीमध्ये पंजाबच्या टीमला ११ भारतीय आणि ४ परदेशी खेळाडू विकत घेता येतील. पंजाबनं मंदीप सिंगला टीममध्ये घेतलं तर मार्कस स्टॉयनिसला बंगळुरूला विकलं. 

पंजाबनं कायम ठेवलेले खेळाडू

ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, करुण नायर, मयंक अग्रवाल, केएल राहुल, आर अश्विन, अंकित राजपूत, अँड्र्यू टाय, मुजीब उर रहमान

पंजाबनं सोडलेले खेळाडू 

एक्सर पटेल, ऍरॉन फिंच, मोहित शर्मा, बरिंदर स्राण, युवराज सिंग, बेन द्वारशूईस, मनोज तिवारी, अक्षरदीप नाथ, पारदीप साहू, मयंक डागर, मंझूर दार