मुंबई: केवळ मुलीच नाहीत तर खेळाडूंचा लाडका असलेल्या महेंद्रसिंह धोनीबाबत एक गोलंदाजानं जे विधान केलं त्याने खळबळ उडाली आहे. एक यशस्वी फलंदाजच नाही तर उत्तम कर्णधार म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या कॅप्टन कूलबाबत एका गोलंदाजानं धक्कादायक विधान केलं होतं. नेमका हा गोलंदाज कोण होता आणि त्याने धोनीबद्दल काय गरळ ओकली होती जाणून घेऊया.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वात मोठा पॉवर हिटर मानला जातो. धोनीने आपल्या मनाने अनेक मोठ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. पण जर कोणी धोनीच्या फलंदाजीवर प्रश्न उभा करत असेल तर ती मोठी आहे. एका गोलंदाजाने त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला आणि ट्रोल झाला.
दिल्ली कॅपिटल्स संघातील दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे याने एक किस्सा सांगितला आहे. 2010मध्ये चॅम्पियन्स लीग टी 20 ट्रॉफी दरम्यान एम एस धोनी याची फलंदाजी फारच अडाणीपणासारखी वाटल्याचं त्याने सांगितलं. 'त्यावेळी धोनीला फलंदाजी कशी करावे हे देखील कळत नव्हतं', असं मला वाटतं असं एनरिचने म्हटलं आहे. 2010मध्ये तो 16 वर्षांचा होता. त्यावेळी चेन्नई सुपरकिंग्स संघासाठी नेट गोलंदाजी करण्यासाठी त्याला सांगण्यात आलं होतं.
नेट गोलंदाजीदरम्यान एनरिचने धोनीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला. 'धोनी प्रामाणिकपणे फलंदाजी करत नाही असंच मला वाटत होतं. मी नेट बॉलिंग करताना पाहिलं की धोनी नीट फलंदाजी करत नव्हता. त्याने आपल्या पायांचा वापर देखील चांगले शॉट्स खेळण्यासाठी केला नव्हता. मी खोटं बोलत नाही. मला त्यावेळी खरंच असं वाटलं की धोनीला कशी फलंदाजी करतात हे माहिती नाही.'
एनरिचने IPL 2020 आणि 2021 दोन्ही आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून गोलंदाजी केली. तर 2020 च्या आयपीएलमध्ये त्याने दिल्ली संघाकडून महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता 2021च्या उर्वरित सामन्यात त्याच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असणार आहेच पण त्याआधी त्याने केलेल्या या अजब दाव्याने मात्र तो चर्चेत आला आहे.