मुंबई: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज कोलकाता विरुद्ध पंजाब सामना रंगणार आहे. पंजाब किंग्स संघाने मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सनं पराभूत केल्यानंतर आता यंदाच्या हंगामातील तिसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे. यावेळी पुन्हा एकदा के एल राहुल आणि ख्रिस गेलची विस्फोटक खेळी पाहायला मिळेल अशी सर्वांनाच आशा आहे.
पंजाबचा फलंदाजीचा क्रम मजबूत आहे आणि कर्णधार लोकेश राहुल संघाच्या वतीने सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने पाच सामन्यांतले तिसरे अर्धशतक ठोकत मुंबई विरुद्ध नाबाद 60 धावा करून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सलामीवीर मयंक अग्रवालदेखील चांगल्या फॉर्मात आहे. तर युनिव्हर्सचा ख्रिस गेलने मुंबईविरुद्ध नाबाद 43 धावांची खेळी करुन आपल्या फॉर्ममध्ये परतल्याचा संकेत दिले.
दुसरीकडे कोलकाता संघातील रनआऊट वेळी झालेला गोंधळ आणि फील्डिंग दरम्यानचा घोळ यातील चुका सुधारून पुन्हा एकदा इयोन मॉर्गनचा संघ नव्या उमेदीनं मैदानात उतरणार आहे. कोलकाता की पंजाब आज कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, इशान पोरेल, दर्शन नालकंडे, ख्रिस जोर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्ड्सन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोइजेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलेन आणि सौरभ कुमार.
इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नीतीश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पैट कमिंस, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर आणि पवन नेगी.