IPL 2021 | विराटसेनेचा सलग दुसरा विजय, कॅप्टन कोहली खूश, राजस्थानला पराभूत केल्यानंतर म्हणाला...

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021)  43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) राजस्थान रॉयल्सवर (RR) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला.   

Updated: Sep 30, 2021, 04:34 PM IST
IPL 2021 | विराटसेनेचा सलग दुसरा विजय, कॅप्टन कोहली खूश, राजस्थानला पराभूत केल्यानंतर म्हणाला... title=

यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021)  43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) राजस्थान रॉयल्सवर (RR) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचे आव्हान बंगळुरुने 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बंगळुरुचा हा या दुसऱ्या टप्प्यातील सलग दुसरा विजय ठरला. (IPL 2021 RR vs RCB 43rd match Bangalore skipper Virat Kohli attributes the victory to the bowlers)

बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या विजयाचं श्रेय हे गोलंदाजांना दिलं आहे. दोन्ही सामन्यात गोलंदाजांनी दणक्यात पुनरागमन करणं, हे संघासाठी चांगले संकेत आहेत, असं विराट म्हणाला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी राजस्थानला शेवटच्या 9 ओव्हरमध्ये 49 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. बंगळुरुने भेदक माऱ्याच्या जोरावर  राजस्थानला 149 धावांवरच रोखलं.  

विराट काय म्हणाला?

"आमच्या गोलंदाजांनी 2 सामन्यांमध्ये दमदार कमबॅक केलं. गोलंदाज कमबॅक करतायेत, हे आमच्यासाठी  चांगले संकेत आहेत. गोलंदाजी करताना तुम्ही संयम राखता तर तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात. दोन्ही सामन्यांमधील प्रतिस्पर्ध्यांनी पावर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 56 धावा केल्या. मात्र यानंतरही आम्ही त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं", असं विराटने म्हंटलं.  

"आमच्याकडे ज्या प्रकारची भक्कम गोलंदाजी आहे, जर आम्ही विकेट्स घेतल्या तर पर्याय उपलब्ध होतील. जेव्हा तुम्ही 2 पॉइंट्सच्या शोधात असता, तेव्हा फलंदाज म्हणून आपण जोखीम पत्कारु शकत नाही. त्यामुळे आम्ही फलंदाजांच्या चुकांवर आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केली", असं विराटने सांगितलं.   
 
"मधल्या षटकात गोलंदाजांचा भेदक मारा आणि फलंदाजांनी केलेली सलामी भागीदारी, या दोन बाबी आमच्यसााठी चांगल्या राहिल्या. मी आणि देवदत्त पडीक्कलने चांगली सलामी भागीदारी केली. सलामी भागीदारी चांगली झाल्यास त्याचा फायदा हा मागील फलंदाजांना होतो. मी आणि पडीक्कलने चांगली सुरुवात दिली, जेणेकरुन त्याचा फायदा श्रीकर भरत आणि एबी डीव्हीलयर्सला उचलू शकतील, असं विराटने नमूद केलं. 

दरम्यान बंगळुरुने आतापर्यंत या मोसमात एकूण 11 सामने खेळले आहेत. बंगळुरुने 11 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला. तर 4 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. बंगळुरु गुणतालिकेत 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.