दुबई : आयपीएल 2021चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरु होणार आहे. 19 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून म्हणजे आजपासून आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. आयपीएलचा अर्ध्यावरचा हा डाव पुन्हा सुरु होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये होणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्यासाठी फार उत्सुक आहेत.
दरम्यान टीम इंडियाच्या T-20चं कर्णधारपद सोडल्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांचं लक्ष विराट कोहलीकडे लक्ष असणार आहे. विराट कोहलीची टीम आरसीबी 20 सप्टेंबरला अबू धाबीमध्ये इयोन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध लढेल. तर दिल्ली कॅपिटल्स (डीसी) 22 सप्टेंबर रोजी केन विलियम्सनच्या सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्ध लढेल.
आयपीएल 2021चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल, तर पहिला क्वालिफायर 10 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. याशिवाय एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर अनुक्रमे 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी शारजामध्ये खेळला जाईल.
The dates are OUT!
Get ready for the #VIVOIPL extravaganza in the UAE
FULL SCHEDULE pic.twitter.com/8yUov0CURb
— IndianPremierLeague (@IPL) July 25, 2021
आयपीएल 2021 च्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 10 गुण असून 7 पैकी 5 सामने जिंकलेत.