मुंबई : IPL च्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन खूप महाग पडत असेल तर आता तुम्हाला स्वस्तात घरबसल्या मोबाईलवर अगदी सहज पाहता येणार आहे.
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास काही Cricket Add-On Prepaid Plan लाँच केले आहेत. हे प्लॅन तुम्ही वापरू शकता. जाणून घेऊया या प्लॅन बद्दल आणि त्याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता.
जिओने 279 रुपयांचा एक प्लॅन आणला आहे. यामध्ये Disney+Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तर 15 GB हायस्पीड डेटा देखील यासोबत मिळेल. या प्लॅनची वैधता तुमच्या मूळ प्लॅनच्या वैधतेएवढीच असणार आहे. हा अॅडऑन पॅक असणार आहे.
सध्या हा प्लॅन सगळ्या सरसकट ग्राहकांसाठी Jio देत नाही. तर काही ग्राहकांनाच या प्लॅनचा फायदा घेता येणार आहे. या प्लॅनबाबत तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुम्ही ह्या प्लॅनचा रिचार्ज करू शकता. शिवाय तुमच्याकडे Jio अॅप असेल तर तुम्ही तिथेही हा प्लॅन चेक करू शकता.
जर तुम्हाला जिओ क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन मिळत नसेल तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. Jio असे अनेक योजना जिओ ग्राहकांना देत आहे ज्यामध्ये तुम्हाला IPL सामने पाहण्याची संधी मिळेल. जिओचा 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणि 25 रुपयांपासून सुरू होणारे डेटा प्लॅन तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.