Mahendra Singh Dhoni: भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही याबद्दल सगळीकडे चर्चा आहे. थालाच्या फॅन्सला त्याने खेळावं असं वाटतं आहे. आता महेंद्रसिंग धोनीने स्वतः आयपीएल 2025 मध्ये खेळणे सुरू ठेवणार की नाही याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी आनांदाची बातमी आहे. खेळणे सुरू ठेवण्याचे संकेत देताना सांगितले की, 'खेळाडू म्हणून शेवटच्या काही वर्षांत मी जे काही क्रिकेट खेळत आहे त्याचा मला आनंद घ्यायचा आहे.' गेल्या सिजनमध्ये, रुतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर धोनीने खूपच खालच्या क्रमाने फलंदाजी केली. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत अटकळ लावली जात होती.
आयपीएल 2025 मध्ये, सर्व फ्रँचायझींना मेगा लिलावापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या अनकॅप्ड अर्थात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे. धोनीला सीएसकेकडून यावर्षी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले जाऊ शकते. ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, धोनीने काही दिवसांपूर्वी गोव्यात झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सांगितले होते की, ''मी माझ्या शेवटच्या काही वर्षात जेवढा क्रिकेट खेळू शकतो त्याचा मला आनंद घ्यायचा आहे'
धोनी म्हणाला, "लहानपणी जसे संध्याकाळी चार वाजता बाहेर पडून खेळायचो तसाच मला खेळाचा आनंद घ्यायचा आहे. फक्त खेळाचा आनंद घेयचा आहे. जेव्हा तुम्ही एखादा खेळ व्यावसायिकपणे खेळता तेव्हा कधी कधी त्याचा आनंद घेणे कठीण होते. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत भावना आणि वचनबद्धता जोडलेली असते, परंतु मला पुढील काही वर्षे खेळाचा आनंद घ्यायचा आहे." गेल्या आठवड्यात, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही सांगितले होते की, मला आशा आहे की धोनी आगामी हंगामात एक खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल.
धोनी म्हणाला, 'तुम्ही खास मागच्या वर्षीबद्दल बोलत असाल तर, टी-20 विश्वचषक संघाची लवकरच घोषणा होणार होती. त्यामुळे जे लोक राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत होते त्यांना संधी दिली पाहिजे. आमच्या संघात (CSK) रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेसारखे खेळाडू होते ज्यांना भारतीय संघात येण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी हवी होती. त्यात माझ्यासाठी काहीही नव्हते. त्यामुळे मी खालच्या कर्मावर ठीक होतो आणि मी जे काही करत होतो त्यावर माझा संघ आनंदी होता."