मुंबई : आजकाल सेलिब्रिटींपेक्षा स्टार किड्स अधिक लोकप्रिय आहेत.
तैमुर अली खान असेल, मिशा कपूर असेल किंवा अगदी महेंद्रसिंग धोनीची मुलगी असेल. या सार्यांचेच फोटो सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होतात.
महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचे निरागस फोटो अनेकांच्या चेहर्यावर नकळत एक गोड स्माईल घेऊन येते. या चिमुकलीचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे. या अकाऊंटावर झिवाचे फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात.
नुकताच झिवाचा एक मल्याळी गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. १९६४ साली आलेल्या ओमनाकुंथन या चित्रपटातील एक गाण झिवा गात आहे.
झिवाच्या आवाजातील हे गाणं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
आजारी असतानाही झिवाने हे गाणं गायलं असल्याचं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. हिवाळ्यात वातावरणात झालेल्या बदलांमुळे झिवा थोडी नाजूक झाल्याचं दिसत आहे.
झिवाचे यापूर्वीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर खूप गाजले होते. कधी ती गाणी म्हणते, कधी धोनीसोबत मज्जामस्ती करते तर कधी आयपीएलच्या संघाची नावं तोंडपाठ सांगते.
काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि टीम इंडियाच्या काही खेळाडूंसोबत मज्जा करतानाचा व्हिडिओदेखील गाजला होता.
झिव्हाचे इंस्टाग्रामवरील फॅन फॉलोवर्स लाखभराहून अधिक आहेत. अवघ्या २४ तासांच्या आतमध्ये झिवाच्या गाण्याला तब्बल लाखभराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.