Attack On Tom Glover: खेळ म्हणजे वाद होणारच...मग तो क्रिकेट असो किंवा फुटबॉल (Football) किंवा आणखी कोणता खेळ. सामन्यादरम्यान नेहमी वाद होत असताना आपण पाहिलं आहे. अनेकदा मारामारी देखील झालीये. मात्र, प्रेक्षकांनी खेळाडूची मारहाण केली, अशी घटना क्वचितच ऐकली असेल. अशातच आता एकीकडे फिफा वर्ल्ड कपचे (FIFA World Cup Qatar 2022) सामने सुरू असताना दुसरीकडे फुटबॉल सामन्यादरम्यान (MCYvMVC) एक धक्कादायक घटना घडली आहे. (Melbourne City goalkeeper Tom Glover left attack from the head as A League game abandoned after violent pitch invasion marathi news)
ऑस्ट्रेलियात खेळलेल्या जात असलेल्या A League मध्ये मेलबर्न सिटी (Melbourne City FC) आणि मेलबर्न व्हिक्ट्री (Melbourne Victory) यांच्यात सामना सुरू होता. यादरम्यान, व्हिक्ट्रीच्या चाहत्यांनी मेलबर्न सिटीच्या गोलच्या पाठीमागे एक फ्लेअर म्हणजेच स्मोकची स्टिक फेकली. सिटीचा गोलकीपर असलेल्या टॉम ग्लोव्हरने (Tom Glover) तोच फ्लेअर चाहत्यांच्या दिशेने फेकली, त्याचा राग प्रेक्षकांना आला. ग्लोव्हरवर हल्ला करणाऱ्या डझनभर प्रेक्षकांनी त्याला चिडवलं आणि सर्व बॅरिकेड्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचं जाळं फोडून मैदानात घुसले.
सामना पाहण्यासाठी आलेल्या गुंडांपैकी एकाने गोलच्या मागे ठेवलेली चुना भरलेली बादली ग्लोव्हरच्या दिशेने फेकली, जी थेट त्याच्या तोंडावर लागली. त्यामुळे ग्लोव्हरच्या (Melbourne City goalkeeper Tom Glover) डोळ्याजवळ दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर सर्व खेळाडू ग्लोव्हरच्या दिशेने धावत गेले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
Sad day for Melbourne #melbderby pic.twitter.com/zxnfNAQAZA
— SamFaff (@SamFaff) December 17, 2022
I started recording at 20’ during the #MelbDerby (as a neutral) to witness what was supposed to be a historic moment of solidarity in the face of APL beauracracy. Instead, what I saw was an exhibition of shameful thuggery, violence and lunacy. Gutted! @aleaguemen #MCYvMVC pic.twitter.com/WmY10djedt
— Dane Whybrow (@DaneWhybrow) December 17, 2022
दरम्यान, टॉम ग्लोव्हर (Attack On Tom Glover) झालेल्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करत राडा घालणाऱ्या प्रेक्षकांना हाकलून लावलं. त्यानंतर खेळाडूंची सुरक्षेचा मुद्दा उरपस्थित करत सामना देखील रद्द करण्यात आला. प्रेक्षकांनी उत्साहात केलेलं कृत्य लाजीरवाणं असल्याचं दोन्ही संघाने म्हटलं आहे.