मुंबई: महेंद्र सिंह धोनीने अनेक खेळाडूंचं क्रिकेटमधील करियर घडवलं आहे. मात्र धोनीच्याच मित्रावर बस चालक म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणारा हा खेळाडू आज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बस चालकाची नोकरी करत आहे. धोनी विरुद्ध IPL आणि वर्ल्ड कपमध्ये खेळाणाऱ्या या खेळाडूवर आज ही वेळ आली.
या खेळाडूचं नाव आहे सूरज रणदीव आहे. 2011 मध्ये भारत वर्ल्ड कपमध्ये सहभागी असलेल्या या खेळाडूवर आज ही वेळ येणं खूपचं चिंताजनक आहे. 2011 मध्ये सूरज हा श्रीलंका टीमचा एक भाग होता. मात्र परिस्थितीमुळे त्याला आज बसचालकाची नोकरी करावी लागत आहे. 2012 मध्ये त्याने 8 सामने खेळून 6 विकेट्स घेतल्या होत्या.
सूरज सध्या ड्रायव्हिंगसोबतच लोकल क्लबसाठी क्रिकेटही खेळतो. त्याने श्रीलंकेसाठी 12 कसोटी सामने खेळून 46 विकेट्स घेतल्या आहेत. तर 31 वन डे सामने खेळून 36 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी 20 मध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूनं विरेंद्र सेहवागशी पंगा घेतला होता.
विरेंद्र सेहवाग यांचं शतक पूर्ण होऊ नये म्हणून सूरजने मुद्दम नो बॉल टाकला होता. ज्यावर सेहवागनं सिक्स ठोकला होता. मात्र नो बॉल असल्यामुळे विरेंद्र सेहवाग शतकापासून हुकला आणि 99 धावांवर नाबाद राहिला. सूरजने टाकलेल्या या नो बॉलमुळेच त्याला भारतात क्रिकेटप्रेमीं ओळखतात.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वीरेंद्र सेहवागला शतकापासून रोखणारा हाच खेळाडू होता. वन डे सामन्यात भारताने 4 विकेट्स गमवल्या होत्या आणि विजयासाठी भारताला 171 धावांचं आव्हान होतं. भारताला विजयासाठी 5 धावा आवश्यक होत्या. सेहवाग 95 धावांवर खेळत होता. मात्र सेहवागला शतकासाठी 5 धावांची गरज असताना एका बॉलवर चौकर तर दुसरा बॉल नो बॉल टाकल्यानं घोळ झाला आणि सेहवाग 99 धावांवर नाबाद राहिला.