Padma Awards Announced, Rohan Bopanna: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये 7 एथलीट्सना यंदाच्या वेळी पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये क्रिकेटर्स, बॉक्सिंग आणि हॉकीच्या खेळाडूंचा मात्र समावेश कऱण्यात आला नाहीये.
यंदाच्या वर्षी 5 जणांना पद्मविभूषण 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात टेनिस स्टार खेळाडू रोहन बोपण्णासह 7 खेळाडूंची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील एकाही दिग्गजाची यावेळी पद्मविभूषण आणि पद्मभूषणसाठी निवड झाली नाही.
खेळाडू | खेळाडू | राज्य |
रोहन बोपण्णा | टेनिस | कर्नाटक |
जोश्ना चिनप्पा | स्क्वॉश | तामिळनाडू |
उदय विश्वनाथ देशपांडे | मलखांब | महाराष्ट्र |
गौरव खन्ना | पॅरा बॅडमिंटन | यूपी |
सतेंद्रसिंग लोहिया | जलतरण | खासदार |
पूर्णिमा महातो | धनुर्विद्या | झारखंड |
हरबिंदर सिंग | पॅरालिम्पिक तिरंदाजी | दिल्ली |
रोहन बोपण्णा सध्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम खेळतोय. यावेळी त्याने या स्पर्धेत इतिहास रचलाय. बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचलीये. बोपण्णाची ही एकूण तिसरी ग्रँडस्लॅम फायनल आहे.
रोहन बोपण्णाने 2017 मध्ये मिक्स डबल्ड फ्रेंच ओपन 2017 दुहेरीचे विजेतेपद पटकावलंय. त्यानंतर बोपण्णाने गॅब्रिएला डब्रोव्स्कीसह ॲना-लेना ग्रोनफेल्ड आणि रॉबर्ट फराह यांचा 2-6, 6-2, [12-10] असा पराभव केला. फ्रेंच ओपनमध्ये पुरुष दुहेरीत बोपण्णाची सर्वोत्तम कामगिरी 2022 मध्ये होती, जेव्हा त्याने उपांत्य फेरी गाठली होती.
महाराष्ट्रातील उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत. त्यांनी हजारो खेळाडूंना मल्लखांबचे प्रशिक्षण दिले आहे. 50 पेक्षा अधिक देशांतील खेळाडूंनी त्यांच्याकडून मल्लखांबचे प्रशिक्षण घेतले आहे.