रविंद्र जडेजापाठोपाठ 'या' टीमचा कॅप्टन सोडणार कर्णधारपद?

IPL मध्ये कॅप्टनच बनला टीमसाठी व्हिलन, लवकरच सोडणार कर्णधारपद?

Updated: May 17, 2022, 11:23 AM IST
रविंद्र जडेजापाठोपाठ 'या' टीमचा कॅप्टन सोडणार कर्णधारपद?  title=

मुंबई : चेन्नईचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र रविंद्र जडेजा खेळाडू म्हणून यशस्वी असला तरी कर्णधार म्हणून तो अपयशीच ठरला आहे. त्यामुळे अखेर त्याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याने कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवलं.

जडेजापाठोपाठ आता पंजाब टीमचा कर्णधारही अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे. पंजाब टीमने मयंक अग्रवालकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. मयंक अग्रवाल पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र त्यातही त्याला अपयश आल्याचं दिसत आहे. 

दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाबला प्लेऑफपर्यंत पोहोचणंही खूप कठीण झालं आहे. कर्णधार म्हणून तो वाईट पद्धतीनं फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो खूप ट्रोल होत आहे. 

मयंक अग्रवालकडून कर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. कारण मयंक अग्रवाल वाईट फॉर्ममध्ये खेळत आहे. दुसरीकडे तो कर्णधार म्हणूनही यशस्वी ठरत नाही. त्यामुळे टीमचं मोठं नुकसान होत आहे. 

मयंक अग्रवाल आपल्या टीमसाठी सर्वात मोठा व्हिलन बनला आहे. त्याने 12 सामन्यात 195 धावा केल्या. त्याचा फ्लॉप शो सुरूच आहे. पुढच्या वर्षी ऑक्शनआधी पंजाब फ्रान्चायझी त्याला रिलीज करू शकते. 

सोशल मीडियावर पंजाबच्या चाहत्यांनी मयंक अग्रवालला चांगलंच ट्रोल केलं. मयंकच्या फ्लॉप शोवर मीम्सही व्हायरल होत आहेत. काही क्रिकेटप्रेमींनी मयंकवर चांगलाच राग काढल्याचंही पाहायला मिळालं.