U Mumba vs Gujarat Giants: प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिजनमधील बुधवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 12 व्या सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सचा 33-27 गुणांनी पराभव केला. यू मुंबाचा या सिजनमधील हा पहिलाच विजय आहे तर, गुजरातला दोन सामन्यांत पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे.
यू मुंबासाठी, अमीर मोहम्मद जफरदानेशने सर्वाधिक 10 गुण मिळवले, तर बचावात सोमवीरने चार गुण मिळवले. याशिवाय कर्णधार सुनील कुमारने तीन गुणांचे योगदान दिले. गुजरातसाठी, सोमवीरने सलग दुसरा हाय-5 मारला पण रेडर्सचे अपयश त्याला महागात पडले. गुमान सिंग आणि प्रतीक दहिया या रेडर्सना अनुक्रमे तीन आणि पाच गुण मिळू शकले. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. चार मिनिटांनंतर स्कोअर 3-3 असा झाला. गुमानने गुजरातला पहिल्यांदा आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर गुजरातच्या बचावफळीने जाफरदानेशचा झेल घेत स्कोअर 5-3 असा केला. सातव्या मिनिटाला गुमानने गुजरातच्या पहिल्या करा किंवा मरोच्या चढाईसाठी गेला पण सोमवीरने त्याला माघारी येऊ दिले नाही. तेव्हा स्कोअर 6-6 झाला होता.
6-6 स्कोअर नंतर कर्णधार नीरजला बाद करत मनजीतने यु मुंबाला 7-6 अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान, सोमवीरने पार्टिकला मागे टाकत मुंबाची आघाडी तीनपर्यंत कमी केली. पहिल्या 10 मिनिटांत मुंबा 9-6 अशी आघाडीवर होती. ब्रेकनंतर राकेशने डू ऑर डाय रेडवर बोनस घेतला. गुजरातसाठी सुपर टॅकल सुरू होते. जफरदानेश लॉबीच्या बाहेर गेला आणि गुजरातने स्कोअर 9-9 असा केला. त्यानंतर चारच्या बचावफळीने मनजीतची शिकार करून गुजरातला आघाडी मिळवून दिली. मात्र, डू ऑर डाय रेडवर रिंकूने गुमानचा घोटा पकडून पुन्हा गुणसंख्या बरोबरी केली. मुंबा 11-10 ने आघाडीवर होता आणि गुजरातसाठी सुपर टॅकल सुरू होती. हिमांशूने येताच एक पॉइंट घेतला आणि परिस्थिती टाळली.
पुढे यु मुंबाला 18-13 अशी लीड मिळाली. ऑलआऊटनंतर गुजरातने सलग तीन गुण घेत पुनरागमनाला सुरुवात केली. तेव्हा स्कोअर 16-21 होता. त्यानंतर जफरदानेशने दोन गुण घेत आघाडी 7 अशी केली. मात्र, गुजरात संघाने सलग तीन गुण मिळवत हे अंतर 4 इतके कमी केले. पुढील चढाईत पार्टिकच्या चुकीमुळे मुंबाला सुपर टॅकल परिस्थितीत जाण्यापासून वाचवले. शेवटी दोन मिनिटे बाकी असताना गुजरातने सुपर टॅकल केले पण तरीही अंतर 6 वरच राहिले.
\
सर्व प्रयत्न करूनही गुजरात संघ हे अंतर भरू शकला नाही आणि त्यांना हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्याला या सामन्यातून एक गुण मिळाल्याने दिलासा मिळणार आहे.