मुंबई : आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचलीय. साखळी फेरीतले शेवटचे सामने उरलेत, यानंतर फायनल सामने होणार आहे. त्यातच आता माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जला राम राम ठोकणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. नेमका जडेजा चेन्नई का सोडतोय याचे कारण समजू शकले नाही आहे, मात्र सीएसके आणि जडेजा यांच्यात मोठा वाद सुरू आहे, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामात चेन्नई सूपर किंग्ज रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. मात्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई (Chennai Super king) खास कामगिरी करू शकली नाही. त्यामूळे रवींद्र जाडेजाने काहीच दिवसांपूर्वी चेन्नईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने हा राजीनामा दिल्याची माहिती आहे. यानंतर चेन्नईची धुरा पुन्हा एकदा महेंद्र सिंहच्या खांद्यावर आली. या दरम्यानचं रवींद्र जडेजाला दुखापतीमूळे आयपीएलपासून दूरू व्हावे लागले होते.
आयपीएल 2022 रविंद्र जडेजासाठी खूप वाईट होता. कर्णधार आणि खेळाडू म्हणून तो अपयशी ठरला. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. या सगळ्यात जडेजा CSK ची साथ सोडू शकतो असे वृत्त आहे.
द इनसाइड स्पोर्टने दिलेल्या माहितीनूसार, रवींद्र जडेजा बरगडीच्या दुखापतीमुळे मोसमातून बाहेर होता. परंतु सूत्रांच्या माहितीनूसार, जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super king) सोशल मीडियावर एकमेकांना आधीच अनफॉलो केल्यामुळे अष्टपैलू खेळाडूला वगळण्यात आलेय. तसेच संघ व्यवस्थापनातील वादामुळे रवींद्र जडेजा खूपच दुखावला आहे. कर्णधारपदाचा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. तसेच कर्णधारपदावर घेतलेल्या निर्णयानंतर कुठेतरी जडेजा मोठे पाऊल उचलू शकतो, असे बोलले जातेय.
जडेजाची कामगिरी
रवींद्र जडेजा आयपीएल 2022 च्या 10 सामन्यांमध्ये 20 च्या सरासरीने केवळ 116 धावा करू शकला. तो 7.51 च्या इकॉनॉमी रेटने फक्त पाच विकेट घेऊ शकला. जडेजाने 8 सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते, त्यापैकी फक्त 2 सामने जिंकले होते, उर्वरित 6 सामने पराभूत झाले होते.