मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजानं नुकताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये वापरण्यात येणाऱ्या जर्सीचा फोटो शेअर केला. सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी टीम इंडियातील खेळाडू करत आहे. 18-22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध WTCचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड टेस्ट सीरिज खेळण्यात येणार आहे. इंग्लंड दौऱ्याआधी जडेजानं आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.
रविंद्र जडेजा 2018मध्ये इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय टेस्ट आणि वन डे टीममधून बाहेर होता. जडेजा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. IPL मध्ये जडेजा गेम चेंजर ठरला आणि त्याने टीम इंडियामध्ये फुल फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते.
जडेजा याने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला की,' ते दीड वर्ष माझ्यासाठी फार कठीण होतं. रात्री शांत झोपही लागायची नाही. मी सकाळी 4-5 वाजताच उठून बसायचो. आता मी काय करू हा विचार सतत मनात आणि डोक्यात असायचा. मी पुन्हा टीम इंडियामध्ये कशी माझी जागा मिळवू शकतो या चिंतेत कित्येक दिवस गेले आहेत. मी टेस्ट किंवा वन डे टीममध्ये होतो मात्र खेळत नव्हतो. मला स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची तशी संधी मिळत नव्हती.'
'2018मध्ये झालेल्या ओव्हल टेस्टने खूप काही दिलं खूप गोष्टी बदलल्या. माझी कामगिरी, आत्मविश्वास आणि सर्वकाही जे एका खेळाडूला अपेक्षित असतं. हार्दिक जखमी झाल्यामुळे मला वन डे खेळण्याची संधी मिळाली. तेव्हापासून मी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा माझा निश्चय केला. मी संघात परतण्याआधी वेळ घेतला आणि त्यानंतर उत्तम फॉर्ममध्ये पुन्हा एकदा आलो.'
'IPL 2021चे सामने सुरू होण्याआधी मी अभ्यास केला. माझ्या पद्धतींमध्ये काही सुधारणा देखील केल्या. टी 20मध्ये वेगळ्या पद्धतीनं खेळायला हवं असं मला त्यावेळी वाटलं. त्यामुळे मी फलंदाजीचा देखील अभ्यास केला होता. सामने सुरू होण्याआधी मी ट्रेनिंग सेशन देखील वाढवले होते. सर्जरीनंतर मी माझं शरीर पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.'
सराव आणि ट्रेनिंग या दोघांचाही फायदा जडेजाला झाला. IPLमध्ये बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्यात जडेजा गेमचेंजर ठरला. जडेजाने केलेली कामगिरी उल्लेखनिय होती. जडेजा आता टीम इंडियाकडून इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष जडेजाच्या तिथल्या कामगिरीवर देखील असणार आहे.