Rishabh Pant India vs Sri Lanka Series: टीम इंडियाला (Team India) नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात श्रीलंकेविरूद्ध (Sri Lanka Series) सिरीज खेळायची आहे. यामध्ये 3 सामन्यांची वनडे आणि 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. श्रीलंकेविरूद्धच्या या दोन्ही सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. टीममधील विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीममधून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला.
पंतला श्रीलंकेविरूद्धच्या वनडे आणि टी-20 या दोन्ही सिरीजमधून टीमबाहेर काढण्यात आलं आहे. मोठी गोष्ट ही आहे की, बीसीसीआयने, प्रेसनोटमद्ये पंतला बाहेर का काढलं आहे, याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात असा प्रश्न उठू लागलाय की, पंतला ड्रॉप केलंय की तो दुखापतग्रस्त आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे त्याचं सिलेक्शन केलेलं नाही?
सूत्रांच्या माहितीनुसार, ऋषभ पंत हा दुखापतग्रस्त आहे. याच कारणामुळे त्याला श्रीलंकेविरूद्धच्या दोन्ही सिरीजमध्ये समाविष्ट केलेलं नाही. ऋषभ पंतच्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. याच कारणाने पंतला स्ट्रैंथ ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं आहे. रिहॅबनंतर पंत कधीपर्यंत ठीक होईल याबाबत माहिती मिळाली नाहीये.
भारतीय टीमला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि 3 वनडे सामने खेळायचे आहेत. यानंतर न्यूझीलंड टीमलाही भारत दौऱ्यावर जायचं आहे आहे. त्यानंतरही टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळणार आहे. अशा परिस्थितीत पंतला न्यूझीलंड सिरीजसाठी टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ऋषभ पंत बांगलादेशाविरूद्ध मीरपूर टेस्टमध्ये 93 रन्सची खेळी केली होती. तर चटगाव टेस्टमध्ये 46 रन्स करता आले होते. त्यापूर्वी ऋषभ पंत 8 सामन्यांमध्ये 7 डावांत फ्लॉप गेलेला दिसून आला. या डावांमध्ये एकदाही पंत 20 रन्सपेक्षा अधिक रन्स करू शकला नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्याकडे टी-20 सिरीजसाठी टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. याशिवाय वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करेल. यामध्ये मराठमोळा खेळाडू सूर्याकुमार यादवला लॉटरी लागली आहे. सूर्यकुमार यादवला टी-20 टीमचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार