Robin Uthappa About Yuvraj Singh : भारतीय क्रिकेट संघातील माजी ऑलराउंडर युवराज सिंह सध्या एका माजी क्रिकेटरने मुलाखतीत केलेल्या दाव्यामुळे चर्चेत आला आहे. भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला. उथप्पाने म्हटले युवराज सिंह कॅन्सर सारख्या आजाराला हरवून परतला मात्र त्यावेळी कॅप्टन असलेल्या विराट कोहलीने त्याला फिटनेस टेस्टमध्ये कोणतीही सूट दिली नाही. परंतु आता युवराज सिंहचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने लल्लनटॉपला एक मुलाखत दिली. यामुलाखतीत त्याने विराट कोहलीवर अनेक आरोप लावले. त्याने मुलाखतीत म्हटले की जेव्हा युवराज सिंह कॅन्सर सारख्या आजारातून बरा झाला आणि पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होता तेव्हा विराटने त्याला फिटनेस टेस्टमधून अजिबात सूट दिली नाही. उथप्पा म्हणाला की, युवराज सिंहने फिल्डिंगमध्ये 2 पॉईंट्सची सूट मागितली, परंतु विराटने ती दिली नाही. मग कसंबसं युवीने संघात स्थान मिळवलं, परंतु केवळ एका सीरिजमधील खराब कामगिरीनंतर युवराजला संघातून वगळण्यात आले, जे त्याच्या करिअरसाठी चांगले ठरले नाही.
Robin Uthappa - "Virat Kohli forced Yuvraj Singh to retire. Yuvraj having just beaten cancer requested a reduction of two points but the egoistic Kohli denied the request. Yuvraj was not treated fairly by Kohli and his management." pic.twitter.com/8vEFsqiR2i
— (jod_insane) January 10, 2025
हेही वाचा : नशीब असावं तर असं! क्रिकेट मॅच पाहायला गेला आणि काही सेकंदात मालामाल झाला
रॉबिन उथप्पाच्या स्टेटमेंटची चर्चा होत असताना युवराज सिंहचा एक वर्षपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवराजने न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा कॅन्सरनंतर माझं पुन्हा कमबॅक झालं तेव्हा विराटने मला सपोर्ट केला होता. जर विराटने मला सपोर्ट केला असता तर मी कमबॅक करू शकलो नसतो.
btw this is what Yuvraj said with his own mouth https://t.co/nzuXhs461L pic.twitter.com/Qznvav9yWn
— soo washed (anubhav__tweets) January 10, 2025
तर याच मुलाखतीत युवराजने म्हटले होते की, "जिथे धोनीचा प्रश्न आहे, त्याने सुद्धा 2019 च्या वर्ल्ड कपबाबत मला स्पष्ट चित्र दाखवलं होतं. त्याने मला सांगितलं की सिलेक्टर्स तुझ्याकडे पाहत नाहीयेत. त्याने मला स्पष्ट चित्र दाखवलं होतं. त्याच्या कडून जेवढं शक्य झालं तेवढं त्याने केलं होतं".