Rohit Sharma च्या सांगण्यावरून पुजाराने मारली सिक्स; ड्रेसिंग रूममधून कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला अवघ्या 76 रन्सचं आव्हान दिलं आहे. मात्र कांगारूंचा विजय होणार यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती, चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या सिक्सची. 

Updated: Mar 2, 2023, 07:27 PM IST
Rohit Sharma च्या सांगण्यावरून पुजाराने मारली सिक्स; ड्रेसिंग रूममधून कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल title=

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. यामधील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पराभव होणार हे जवळपास निश्चित झालं. टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला अवघ्या 76 रन्सचं आव्हान दिलं आहे. मात्र कांगारूंचा विजय होणार यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती, चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या सिक्सची. 

पुजाराने कांगारू गोलंदाजांच्या नाकात भरला दम

तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावाच्या फलंदाजीसाठी उतरली होती. यावेळी टीम इंडियाच्या महत्त्वाच्या फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नाही. यावेळी एका बाजूने डाव सावरला तो ऑस्ट्रेलिया जुना शत्रू चेतेश्वर पुजारा याने. एका बाजूने विकेट्सची पडझड होत असताना पुजाराने मात्र एक बाजून भिंतीप्रमाणे लावून धरली होती. 

पुजाराने ठोकला जबरदस्त सिक्स

याचवेळी चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीची अधिक चर्चा होऊ लागली, जेव्हा त्याने एक खणखणीत सिक्स लगावली. मुख्य म्हणजे टीम अशा परिस्थितीत असताना क्रिजवर टिकून राहणं फलंदाजासाठी कठीण असतं. मात्र कशाचाही विचार न करता नॅथन लिऑनच्या बॉलवर जबबरदस्त सिक्स लगावला. त्याचा हा सिक्स पाहून कांगारूंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला देखील विश्वास बसला नाही. 

रोहित शर्माने दिलेला खास मेसेज

हा सिक्स पाहून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ड्रेसिंग रूममधून खूश झाल्याचं दिसून आलं. मुख्य म्हणजे, पुजाराला रोहित शर्माने खास मेसेज पाठवला होता. आणि त्यानंतर पुजाराने ही सिक्स मारली. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये एकच आनंदाचं वातावरण दिसून आलं. सोशल मीडियावर याचा व्हायरल होतोय.

सतत विकेट्स पडत होते आणि 54 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने 7 विकेट्स गमावले होते. अशातच कर्णधार रोहित शर्माने ईशान किशनच्या माध्यमातून चेतेश्वर पुजारासाठी खास मेसेज पाठवला. यानंतर पुढच्याच्या ओव्हरमध्ये लिऑनच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला. त्याच्या या कामगिरीने रोहित खूश झाला आणि हवेत आनंदाच्या भरात मुक्का मारला.