मुंबई : रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित आणि राहुल यांनी शानदार सलामी भागीदारी झाली. या जोडीने भारतीय संघाला शानदार विजय देखील मिळवून दिला. रोहित शर्माने 36 चेंडूत 55 धावांची आक्रमक खेळी खेळली आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29व्यांदा 50 हून अधिक धावा केल्या.
रोहित शर्माने आपल्या इनिंगमध्ये 5 सिक्स मारले. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीने 29 वेळा T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोलकातामध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माला विराट कोहलीचा 29 धावांचा आकडा मागे टाकण्याची संधी असेल.
रोहित शर्माने T-20 फॉरमॅटमध्ये 110 डावांमध्ये 4 शतकं आणि 25 अर्धशतकं केली आहेत, तर विराट कोहलीने 87 डावांमध्ये 29 अर्धशतकं केली आहेत.
मार्टिन गप्टिल- 3248 रन, अर्धशतकं- 19, शतकं- 2
विराट कोहली- 3227 रन, अर्धशतकं- 29, शतकं- 0
रोहित शर्मा- 3141 रन, अर्धशतकं- 25, शतकं 4 (एकूण 50+ = 29)
यासोबतच रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये करिअरच्या धावसंख्येच्या बाबतीत माजी कर्णधार विराट कोहलीच्या मागे नाही. रोहितला विराट कोहलीच्या (3227) पुढे जाण्यासाठी 86 धावांची गरज आहे. रोहितच्या या फॉरमॅटमध्ये 3141 धावा आहेत. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात किवीचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने (3248) विराट कोहलीला मागे टाकलं होतं.
रांची टी-20 मधील विजयानंतर भारतीय संघाने मालिकाही जिंकली आहे. रविवारी कोलकातामध्ये होणार्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून टीम इंडियाला क्लीन स्वीपसह कसोटी मालिकेत प्रवेश करायचा आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून दोन्ही T-20 सामन्यांमध्ये टॉस जिंकला आहे. शेवटच्या टी-20 सामन्यातही टॉस खूप महत्त्वाचा ठरला होता.