India vs Pakistan : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपमधील (World Cup) कट्टरप्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दोन्ही संघ शनिवारी ऐकमेंकांशी भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उस्तुकता आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकावेळी एक लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. अशातच आता या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली. त्यावेळी त्याने शुभमन गिलच्या फिटनेसच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने (Rohit Sharma Statement) उत्तर दिलंय. पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल 99 टक्के फिट आणि तयार आहे, असं रोहित शर्मा याने म्हटलं आहे. त्यामुळे आता सलामीसाठी शुभमन (Shubman Gill) आणि रोहित शर्मा येतील, हे पक्कं झालंय.
वर्ल्ड कपचे दोन्ही सराव सामने पावसात वाहून गेले. तर पहिल्या दोन्ही सामन्यात शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याच्या तब्यतीत सुधारणा होत असल्याने शुभमन नेट्समध्ये बॅटिंग करताना दिसला होता. शुभमनने पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये धुंवाधार फलंदाजी केली होती. त्यामुळे शुभमन गिलची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
पाकिस्तानचा संघ : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.