दिल्ली : सौराष्ट्रचा फलंदाज अवि बारोट याचं गुरुवारी वयाच्या 29व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अविचं अकाली निधन झालं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या हवाल्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.
सौराष्ट्र व्यतिरिक्त, अवी बरोट हरियाणा आणि गुजरातसाठी देखील तो क्रिकेट खेळला होता. तसेच तो टीम इंडियाच्या अंडर -19 संघाचा भाग होता. रणजी क्रिकेट चॅम्पियन संघाचाही भाग होता.
अवि बरोटच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे अविच्या जाण्याने दुःख झालं असल्यातं सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. 15 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अवि बरोटचं निधन झाल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
Our hearts bleed as outstanding player and very noble being Avi Barot is no more with us. It’s extremely shocking and saddening. May his noble soul be in shelter of benevolent Almighty. Avi, you shall be missed forever #rip @saucricket @GCAMotera @BCCI @BCCIdomestic #cricket pic.twitter.com/wzRONq95JV
— Saurashtra Cricket (@saucricket) October 16, 2021
अवि बरोट एक उत्तम फलंदाज होता. अवि ऑफ-ब्रेक गोलंदाजी तसंच यष्टीरक्षण देखील करायचा. अविने एकूण 38 प्रथम श्रेणी सामने खेळलेत. ज्यात त्याने 1547 धावा केल्या. त्याच वेळी, सुमारे 38 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1030 धावा केल्या गेल्या. केवळ 20 टी -20 सामन्यांमध्ये 717 धावा केल्या.
जेव्हा सौराष्ट्राच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा अवि बरोट त्या विजयी संघाचा भाग होता. अविने सौराष्ट्रसाठी 21 रणजी सामने, 17 लिस्ट ए सामने, 11 टी -20 सामने खेळले आहेत. अवि बरोट यावर्षी मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला.