जोहान्सबर्ग : भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) ने दुसऱ्या टेस्टमध्ये 18 बॉलमध्ये संपूर्ण सामन्यांचा मार्गच बदलला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (India vs South Africa) मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाने शानदार सुरुवात केली. एक विकेट गमावून 88 रन वर संघ खेळत होता. पण नंतर शार्दुलने 18 बॉलमध्येच संपूर्ण सामन्याचा चेहरा बदलला. त्याने 3 विकेट घेत दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का दिला.
लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट गमवत 102 रन केले. टीम इंडिया (Team India) ने पहिली इनिंगमध्ये 202 रन केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने 35 रनपासून पुढे खेळायला सुरुवात केली. एक तास संघाने चांगली कामगिरी केली.
ओपनर डीन एल्गर आणि कीगन पीटरसनने 53 रन जोडले. पण शार्दुल ठाकुरने 39 व्या ओव्हरमध्ये कर्णधार एल्गरला विकेटकीपर ऋषभ पंतच्या हातून झेलबाद केलं. त्याने 120 बॉलमध्ये 28 रन केले. या दरम्यान त्याने 4 फोर मारले.
कीगन पीटरसनने पहिल्या टेस्टमध्ये ही चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या टेस्टमध्ये ही त्याने अर्धशतकीय खेळी केली. त्याने 118 बॉलमध्ये 62 रन केले. ज्यामध्ये 9 फोरचा समावेश आहे. शार्दुल ठाकुरच्या बॉलवर तो स्लीपला आऊट झाला. एल्गरच्या विकेटनंतर रासी वान डर डुसैन 1 रनव आऊट झाला.
शार्दुल ठाकुरने 3 विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणलं. यानंतर सोशल मीडियावर मीम्स येऊ लागले. टीम इंडिया तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये 1-0 ने पुढे आहे. भारतीय संघ जर दुसरा सामना जिंकते तर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरीज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Every time India needs a wicket desperately, Shardul Thakur comes & bless us all!
All bow down to the Lord Shardul Thakur Supremacy!#SAvIND pic.twitter.com/iBZkiLZAXZ— Vishal Verma (@VishalVerma_9) January 4, 2022
Save earth, this is the only place having Lord Shardul Thakur. pic.twitter.com/3Rr7sBhMfb
— R A T N I S H (@LoyalSachinFan) January 4, 2022
#Shardulthakur supremacy pic.twitter.com/CNvkkTHlPF
— Jimil Patel (@jimilpatel_) January 4, 2022
We believe in Lord Shardul Thakur supremacy #INDvsSA pic.twitter.com/YxoACYHvO9
— राष्ट्र भक्त (@dilsesuperstar) January 4, 2022