Suryakumar Yadav: रायपूरच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियावर 20 रन्सने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा मिळवला आहे. दरम्यान या सामन्याच्या टॉस दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर ( Suryakumar yadav ) खिळल्या होत्या. सूर्याने टॉसच्या वेळी असं काय केलं ते पाहूयात.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायपूरच्या क्रिकेट स्टेडियममध्ये टॉस उडवताना सूर्याने ( Suryakumar yadav ) असं कृत्य केलं ज्यामुळे पाहणाऱ्यांना हसू आवरलं नाही.
टॉसच्या वेळी प्रेसेंटेटरने सूर्याला ( Suryakumar yadav ) टॉस उडवण्यास सांगितला. यावेळी सूर्या खिसे चाचपडू लागला. सूर्याचं हे कृत्य पाहून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड देखील गोंधळला. मात्र यानंतर सूर्याने खिशातून नाणं बाहेर काढलं आणि टॉससाठी उडवलं. हे पाहून प्रेसेंटेटर आणि मॅथ्यू वेडला देखील हसू आलं. दरम्यान सूर्या टॉसचं नाणं नेमकं खिशात का ठेवतो, हे मात्र अजून समजू शकलेलं नाही.
Toss Update
Australia win the toss and elect to bowl in Raipur.
Follow the Match https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GD0PhQIepF
— BCCI (@BCCI) December 1, 2023
तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस वेळी नाणं सूर्याने ( Suryakumar yadav ) खिशात ठेवले होतं. टॉस करण्याची वेळ आल्यावर त्याने खिशातील नाणं शोधायला सुरुवात केली. त्यावेळी नाणं शोधण्यासाठी थोडा वेळ लागला होता. दरम्यान प्रेसेंटेटर मुरली कार्तिकने विचारलं होतं की, नाणे मिळाले का?
Toss Update
Australia win the toss and elect to bowl in Guwahati.
Follow the Match https://t.co/vtijGnkkOd#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZA4pH9wR3Y
— BCCI (@BCCI) November 28, 2023
रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या या सिरीजवरही कब्जा मिळावलाय. अशातच सूर्यकुमारच्या ( Suryakumar yadav ) कॅप्टन्सीखाली एक इतिहास देखील रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवल्याचा रेकॉर्ड नावी केलाय. भारताने 213 पैकी 136 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकले असून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने 135 विजय मिळवले होते.