मुंबई : पाकिस्तानची (Pakistan) टी 20 वर्ल्ड कप 2022 मधील (T20 World Cup 2022) सुरुवात निराशाजनक राहिलीय. टीम इंडिया (Team India) विरुद्धच्या पराभवानंतर झिंबाब्वेने (Zimbabwe) पाकिस्तानवर विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानचा या दोन्ही सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभव झाला. पाकिस्तानचा सलग 2 पराभवांमुळे सेमीफायनलचा (Semi Final) मार्ग खडतर झालाय. मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. नक्की काय समीकरण आहे, हे जाणून घेऊयात. (t 20 world cup 2022 pakistan lost 2 consecutively match even know how to qualified for semi final know scenario)
टीम इंडियाने ग्रुप 2 मध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड (Netherlands) विरुद्ध शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) गुरुवारचा सामना रद्द झाला. तर त्याआधीच्या सामन्यात आफ्रिकने विजय मिळवला. त्यामुळे आफ्रिकाकडे 3 पॉइंट्स आहेत. तसेच झिंबाब्वेचेही 3 पॉइंट्स आहेत. आता या समीकरणानुसार टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये जाणं जवळपास निश्चित आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेकडून एक टीम सेमी फायनलमध्ये पोहचेल.
पाकिस्तानला पहिल्या 2 पराभवनंतर उर्वरित 3 सामने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तानला आता दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि बांगलादेशचा सामना करायचा आहे. पाकिस्तान हे तिन्ही सामने मोठ्या अंतराने जिंकले तर 6 पॉइंट्स होतील. विषय इथेच संपत नाही. तर झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेचा उर्वरित 3 पैकी प्रत्येकी 2 सामन्यात पराभव झालाच, तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचेल. एकंदरीत पाकिस्तानचं सेमी फायनलचं तिकीट हे जर-तर भगवानभरोसे आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचं काय होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.