T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्डकप 2022 साठी एक महिना शिल्लक आहे. सर्व संघ आता त्याची तयारी करत आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी आतापर्यंत सहा संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पाकिस्तानी संघही एक ते दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजताना दिसत असतानाच, टीम घोषणेपूर्वी पाकिस्तानी संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
टी-20 विश्वचषकात यावेळी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघ विश्वचषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे, हा सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IndvsPak) यांच्यात सामना झाला होता. यामध्ये पहिला सामना टीम इंडियाने पाच गडी राखून जिंकला होता, तर सुपर 4चा सामना पाकिस्तानी संघाने पाच विकेटने जिंकला होता.
आशिया चषक 2022 मध्ये, पाकिस्तानी संघ आशिया कप जिंकू शकला नाही. संघात आपल्या एका खेळाडूची कमतरता त्यांना नक्कीच भासत होती. तो खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी. शाहीन शाह आफ्रिदीचा T20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला होता, परंतु सामना सुरू होण्यापूर्वी त्याला दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर व्हावे लागले.
आशिया चषक 2022 नंतर, पाकिस्तान संघाची घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु जेव्हा संघाची घोषणा होईल तेव्हा शाहीन शाह आफ्रिदीचे (shahin shah afridi) नाव नक्कीच असेल. दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदीने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पूर्णपणे फिट दिसत आहे आणि व्यायाम करताना दिसत आहे. आफ्रिदी जिममध्ये वर्कआऊट करून घाम गाळत आहे. अशा परिस्थितीत तो आता गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला आहे, असे मानले जाऊ शकते. मात्र, याआधी पाकिस्तानी संघ इंग्लंडसोबत त्यांच्या घरच्या मैदानावर सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, त्यातच तो खेळण्याच्या स्थितीत आहे की नाही हे कळेल.
शाहीन शाह आफ्रिदी (shahin shah afridi) बऱ्याच दिवसांपासून संघातून बाहेर आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतही तो खेळू शकला नाही आणि त्यानंतर आशिया चषकही मुकला. अशा परिस्थितीत शाहीन आफ्रिदीलाही संघात सामील होऊन खेळायला आवडेल.