मुंबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी सासरा शाहिद आफ्रिदीच्या पावलावर पाऊल ठेवतांना दिसत आहे. त्याचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालाय. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. शाहीन सध्या T20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. पाकिस्तान 9 नोव्हेंबरला सिडनीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सेमीफायनल सामना खेळणार आहे.
आफ्रिदीने सिडनीमध्ये भारतीय चाहत्यांची भेट घेतली आणि यादरम्यान त्याने एका भारतीय चाहत्याला तिरंग्यावर ऑटोग्राफ दिला. 2018 मध्ये त्याचा होणारा सासरा शाहिद आफ्रिदीने देखील तिरंग्याबद्दल आदर दाखवला. सामन्यानंतर त्याने भारतीय चाहत्यांसोबत फोटोसाठी पोज दिली. याआधी आफ्रिदीनेही भारतीय क्रिकेट चाहत्यांसोबत फोटो काढताना तिरंगा सरळ आहे की नाही याची काळजी घेतली आणि तिरंगा सरळ पकडण्याचं आवाहन केलं होतं.
भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. जगभरातील लोकं हा सामना पाहण्यासाठी उत्सूक असतात. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळेच त्यांचा सामना म्हटलं की, सामन्याचं तिकीट मिळणं देखील कठीण होऊन जातं.
भारत-पाकिस्तान मध्ये अनेक चाहते आहेत. ज्यांचे नातेवाईक भारत किंवा पाकिस्तानमध्ये राहतात. त्यामुळे कधीकधी ते दोन्ही देशांना सपोर्ट करताना दिसतात. खेळात मात्र खेळाडू खेळाडूवृत्ती दाखवतात. एकमेकांना भेटतात. दोन देशांमधील दरी कमी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात.