मुंबई : यूएई आणि ओमानमध्ये टी-20 विश्वचषक 2021 (T20 world Cup) सुरू झाला आहे. एकीकडे या स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत, तर दुसरीकडे सराव सामनेही सुरू झाले आहेत. भारताने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर 7 गडी राखून मात केली. हा सामना संपल्यानंतर, बर्याच गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या की पाकिस्तानविरुद्धच्या (Ind vs pak) सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंना संघात स्थान मिळणार आहे.
टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या सलामीसाठी रोहित शर्माचे (Rohit sharma) स्थान निश्चित झाले आहे. दुसऱ्या फलंदाजाबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, केएल राहुल (Kl Rahul) किंवा इशान किशन (ishan kishan) यांच्यातील कोण रोहितसोबत उतरेल. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीच्या सलामीची चर्चाही समोर येत होती. पण पहिल्या सराव सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने स्वतः एक गोष्ट स्पष्ट केली आहे की संपूर्ण विश्वचषकात रोहितसोबत फक्त केएल राहुलच सलामी देईल.
त्याचबरोबर टीम इंडियाच्या मधल्या फळीत मोठे बदल दिसू शकतात. कर्णधार कोहली ( Virat kohli) स्वतः तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्याचबरोबर आता ईशान किशनने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. यामागील मोठे कारण म्हणजे सूर्यकुमार यादवची चौथ्या क्रमांकाची कामगिरी अतिशय मध्यम दर्जाची आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे स्थान 5 व्या क्रमांकावर निश्चित झाले आहे.
हार्दिक पंड्या (Hardik pandya) सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जडेजा 7 व्या क्रमांकावर खेळेल. जर हार्दिक गोलंदाजी करू शकतो, तर संघ खूप चांगल्या लयमध्ये असेल. हे दोन खेळाडू फलंदाजीने काय कमाल करू शकतात ते जगाला माहीत आहे. अशा परिस्थितीत वर्ल्डकपमध्ये दोन्ही खेळाडूंकडून बऱ्याच आशा असतील.
गोलंदाजी विभागातही मोठे बदल होणार आहेत. फास्ट बॉलिंग युनिटमध्ये भुवनेश्वर कुमारची एक्झिट स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर त्याची जागा शार्दुल ठाकूरला दिली जाऊ शकते. शार्दुलला स्थान देण्याचे अनेक फायदे आहेत, कारण तो लांब फटकेही मारू शकतो. दुसरीकडे, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसाठी जागा आधीच ठरलेली आहे. फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात युद्ध होईल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11: (Playing 11)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.