मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या वनडेत पराभव झाला. न्यूझीलंडने ८ विकेटने भारतावर विजय मिळवला. या विजयासह या सिरीजमध्ये किवींनी आपलं विजयाचं खातं उघडलं. सिरीजमधील आधीचे ३ सामने भारताने जिंकत सिरीज जिंकली असली तर आज भारताचा दारुण पराभव झाला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत झालेल्या या सामन्यात टीम इंडिया ९२ रनवर ऑलआऊट झाली. टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने टीम इंडियाच्या फंलदाजांना चांगलेच धक्के दिले. यानंतर किवीच्या फलंदाजांनी २ विकेट गमवत ९३ रनचं टार्गेट सहज गाठलं. भारताचा हा वनडे क्रिकेट इतिहासातला सर्वात मोठा पराभव होता.
न्यूझीलंडने २१२ बॉल बाकी ठेवत भारतीय टीमचा पराभव केला. त्यामुळे हा भारतीय टीमचा सर्वात मोठा पराभव ठरला. सर्वाधिक बॉलच्या फरकाने याआधी २०१० मध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्या सामन्यात २०९ बॉल बाकी ठेवत श्रीलंकेने विजय मिळवला होता. २१ रन देत ५ विकेट घेणारा बोल्ट मॅन ऑफ द मॅच ठरला. टीम इंडियाच्या वनडे इतिहासातील हा दुसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.
भारताकडून सर्वाधिक धावा या युजवेंद्र चहलने केल्या. त्याने नाबाद 18 धावांची खेळी केली. या खालोखाल गेल्या सामान्यात पुनरागमन केलेल्या हार्दिक पांड्याने 16 धावा केल्या. तर कुलदीप यादवने 15 धावांची कामगिरी केली.