Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण

Women's T20 World Cup 2024 : बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

पुजा पवार | Updated: Oct 10, 2024, 01:10 PM IST
Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS SL Women's T20 World Cup 2024 : भारतीय महिला क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जोरदार कमबॅक केलं असून त्यांनी लागोपाठ दोन सामने जिंकून सेमी फायनलचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडिया ग्रुप ए मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

सेमी फायनलपासून फक्त एक पाऊल दूर : 

आयसीसी टी 20 महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे सेमी फायनलमध्ये पोहोचणे अवघड वाटतं होते. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान विरुद्ध  विजय मिळवून भारताने स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम ठेवले. त्यानंतर श्रीलंके विरुद्ध रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. आता ग्रुप स्टेजमध्ये भारताचा शेवटचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया सोबत आहे. भारताने जर ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सहज सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करू शकतात. 

सर्वात मोठा स्कोअर, सर्वात मोठा विजय : 

टीम इंडियाने महिला आयसीसी टी 20 वर्ल्ड कपचा सर्वात मोठा स्कोअर बनवला. श्रीलंकेविरुद्ध खेळताना कॅप्टन हरमनप्रीत कौरने 27 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. यापूर्वी साउथ आफ्रिकेने स्कॉटलॅंड विरुद्ध दुबईत खेळताना 5 विकेटवर 166 धावा केल्या होत्या. श्रीलंकेला भारताने 90 धावांवर ऑल आउट करून 82 धावांनी विजय मिळवला. या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय T20 मध्ये धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.

हेही वाचा : 'देशाला हादरवून टाकलंत...', रतन टाटांच्या निधनावर काय म्हणाला क्रिकेटचा देव?

सेमी फायनलचं समीकरण बदललं : 

टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या ग्रुप स्टेज सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 102 धावांवर ऑल आउट झाली होती. त्यामुळे ग्रुप ए च्या पॉईंट टेबलमध्ये खालच्या स्थानी पोहोचली. टीम इंडियाचा नेट रनरेट हा नेगेटिव्हमध्ये पोहोचला होता. पण पाकिस्तान आणि मग श्रीलंका यांच्या विरुद्ध मोठा विजय मिळाल्यावर भारताचा नेटरन रेट आता पॉझिटिव्हमध्ये गेला असून पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर भारताच्या खालोखाल पाकिस्तान तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. पाचव्या क्रमांकावर अजून एकही सामना न जिंकलेली श्रीलंकेची टीम आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ नंबर 1 वर आहे. ग्रुप स्टेज सामन्यासाठी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सहभागी झालेल्या 10 संघांना  5-5 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं असून दोन्ही ग्रुपमधील टॉपचे प्रत्येकी 2-2 संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतील.