Akash Chopras big prediction indian team captain : क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सांभाळत आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनाने टी-20 मालिकेसाठी टी-20 क्रिकेटची जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे. वर्ल्ड कपसाठी चांगलं प्रदर्शन होण्यासाठी संघातील मोठ्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. मात्र काही दिवसांपासून वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कॅप्टन करणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत आहेत. मात्र अशातच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने भावी कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.
विराट कोहली जेव्हा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे. मात्र बोर्डाने वर्कलोड मॅनेजमेंटची सबब वापरून खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये अनेक कर्णधारांना वापरून पाहिलं. त्यामुळे रोहित शर्मानंतर भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहितनंतर अनेकांनी अनेक दिग्गजांनी खेळाडूंची नावे सुचवली आहेत. त्यातील आकाश चोप्रानेही कर्णधारपदासाठी दोन नावे सुचवली आहेत.
मला वाटत नाही आता भारताच्या सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार दिसणार आहे. रोहित शर्मा टेस्ट चॅम्पियनशिपपर्यंत कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे. हार्दिक पांड्या हा सध्याचा टी-20 चा कर्णधार असून तो कायम 2024च्या आयसीसी टी-20 विश्वचषकापर्यंत असणार असल्याचं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
दरम्यान, 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकपर्यंत रोहित शर्मा भारताचा कर्णधार असणार आहे. जर भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारपदाबद्दल बोलायचं झालं तर शुभमन गिल आणि ऋषभ पंत दावेदार आहेत. भारताचं कर्णधारपद सांभाळण्यासाठी हे दोघे असतील, असं आकाश चोप्रा म्हणाला.