मुंबई : कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सुरु असलेल्या दूसऱ्या टेस्टमध्ये भारताची बाजु धरुन ठेवली आहे. विराटने दुसऱ्या टेस्टमध्ये शतक देखील झळकावलं आहे.
भारताने दिवस अखेर पांच विकेट गमवत 183 रन केले होते. तर आफ्रिकन टीमने पहिल्या इनिंगमध्ये 335 रन केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन एडेन मार्करामने सर्वाधिक 94 रन केले. हाशिम अमलाने 82 रन केले. दक्षिण आफ्रिकेने दिवसाची सुरुवात ६ विकेट वर 269 रन्सवर केली होती. पण दूसऱ्या दिवशी ते फक्त ६६ रन बनवू शकले.
सेंचुरियन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये एडेन मार्करामने सर्वाधिक 94 रन केले. त्याचं शतक चुकलं. पण विराटने त्याच्या खेळीचं कौतूक केलं आहे. एडेन मार्कराम 94 रनवर रविचंद्रन अश्विनने आउट केलं. त्यानंतर विराट कोहली त्याच्याकडे गेला आणि त्याच्या खेळीचं कौतूक करत म्हटलं की, 'तू खूप छान खेळला. पण दुर्भाग्याने आऊट झाला.'
भारताचा कर्णधार विराट कोहली ही जगात टॉप बॅट्समनमध्ये येतो. पण तरी देखील त्याने विरुद्ध टीमच्या खेळाडूचं कोतूक करत एक वेगळं उदाहरण कायम केलं आहे. विराटच्या या स्पोर्ट्समॅनशिपचं कौतूक होत आहे.