मुंबई : वेस्टइंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर (west indies tour of india 2022) येणार आहे. या दौऱ्यात विंडिज टीम इंडिया (Team India) विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या वनडे सीरिजसाठी आज (26 जानेवारी) टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वनडे सीरिजसाठी कोणाला संधी मिळणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार हे आपण पाहूयात. (west indies tour of india 2022 may be today announcement team india squad for odi series)
कोणाला संधी मिळणार?
विडिंज विरुद्धच्या या मालिकेसाठी रिषी धवन (Rishi Dhawan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) या दोघांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. तर भुवनेश्वर कुमारला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वरला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भुवीला टीमबाहेर बसावं लागू शकतं.
तर दुसऱ्या बाजूला रवीचंद्रन अश्विनलाही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र अश्विनला दुखापत असल्याचंही म्हंटलं जात आहे.
हिटमॅनचं कमबॅक निश्चित?
विडिंज विरुद्धच्या या मालिकेतून वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन 'हिटमॅन' रोहित शर्मा कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित बंगळुरुत एनसीएमध्ये दुखापतीवर मेहनत घेतोय. तसेच रोहितने आज फिटनेस टेस्ट दिल्याचंही म्हटलं जात आहे.
बैठकीत अनेक विषयांवर चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, निवड समितीच्या या बैठकीत टीम इंडियाचा कसोटी संघाच्या कर्णधारदपदाची सूत्रं कोणाला द्यायची, याबाबत चर्चा होऊ शकते.
तसेच आयपीएल ऑक्शन, आयपीएलचं आयोजन आणि मीडिया राईट्स या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते.
संपूर्ण सामन्याचं आयोजन दोनच स्टेडियमवर
दरम्यान या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेचं आयोजन हे अनुक्रमे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आणि कोलकातामधील इडन गार्डन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता खेळाडूंना कोणताही धोका संभवू नये म्हणून बीसीसीआयने ही खबरदारी घेतली आहे.
वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली वनडे - 6 फेब्रुवारी
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी
वरील तिन्ही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी
टी 20 मालिकेतील तिन्ही सामने कोलकातातील इडन गार्डनमध्ये पार पडतील.