Virat Kohli, Babar Azam: जगातील मोस्ट स्टायलिश प्लेयर्सच्या (Most Stylish Players) यादीत विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांचं नाव हमखास येतं. 2015 च्या वर्ल्ड कप सामन्यात दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून बाबर आझमची ओळख भारतात निर्माण झाली होती. दोघांच्या खेळण्याची स्टाईल देखील एकसारखी. दोघांचा फेवरेट शॉट देखील एकच... कवर ड्राईव्ह (Cover Drive). मात्र, दोन्ही खेळाडूंपैकी कोणाचा कवर ड्राईव्ह चांगला?, असा सवाल विचारला तर अनेकजण गोंधळात पडतात. अशातच आता न्यूझीलंडचा रेग्यूलर कॅप्टन केन विल्यमसनने (Kane Williamson) यावर उत्तर दिलंय.
केन विल्यमसनला विचारण्यात आलं की, कोहली आणि बाबर यांच्यामध्ये (Whose cover drive is better?) कोण कव्हर ड्राइव्ह अधिक चांगला खेळतो?, तुमचा आवडता कोण आहे? त्यावर केन विल्यमसनने (Kane Williamson) उत्तर दिलं. त्यावेळी त्यानं मनमोकळं उत्तर दिलं. मला विराट कोहलीचा कव्हर ड्राइव्ह अधिक (Virat Kohli's cover drive is better) आवडतो, असं केन विल्यमसन म्हणाला आहे.
सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs NZ 3rd T20I) केन विल्यमसन मेडिकल अपॉइंटमेंटमुळे खेळू शकला नाही. त्यानंतर तो आगामी वनडे मालिकेत देखील उपलब्ध असणार नाही. त्यामुळे आता नवा हंगामी कॅप्टन शिखर धवनचं (Shikhar Dhawan) टेन्शन कमी झालंय.
आणखी वाचा - NZ vs IND, 3rd T20 : तिसरा सामना टाय, भारताने मालिका जिंकली
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील शेवटच्या सामना पावसामुळे ड्रॉ राहिला. सामना सुरू असताना पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईन नियमानुसार (Duckworth-Lewis rule) सामना बरोबरीने सुटला. त्यामुळे भारताने ही सिरीज 1-0 ने जिंकला आहे. टी-ट्वेंटी नंतर आता यंगिस्तान वनडे मालिका (IND vs NZ ODI) खिश्यात घालणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.