Shardul Thakur Amazing Catch Video: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील भारताच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताने संघात एकमेव बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारताने जिंकला असला तरी हा विजेता संघ बदलण्यात आला आहे. भारताने संघामध्ये आर. अश्वीनऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे. या संधीचं शार्दुलने सामन्यातील पहिल्या 15 ओव्हरमध्येच केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. लॉर्ड शार्दुल नावाने ओळखल्या जाणाऱ्या शार्दुलने उत्तम झेल घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
अफगाणिस्तानच्या संघाने संयमी सुरुवात केली. सातव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर भारताला पहिलं यश मिळालं. सलामीवर इब्राहिम झॅड्रॅन जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विकेटकीपर के. एल. राहुलकरवी झेलबाद झाला. 10 ओव्हरनंतर अफगाणिस्तानचा स्कोअर 48 वर 1 बाद असा होता. त्यानंतर अफगाणिस्तानचा स्कोअरकार्ड 63 वर असताना शार्दुल ठाकूरने केलेल्या अप्रतिम फिल्डींगमुळे भारताला दुसरं यश मिळालं. बर्थडे बॉय हार्दिक पंड्याला शार्दुलने एकप्रकारे वाढदिवसाची भेट म्हणून रेहमानुल्ला गुरुबाजची विकेट दिली असं म्हटलं तरी हरकत नाही.
झालं असं की, सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये षटकार मारण्याच्या नादात रेहमानुल्लाने उंचावर मारलेला चेंडू अगदी सीमारेषेजवळ गेला. हा फटका आता षटकारच जाणार असं वाटत असतानाच लॉर्ड शार्दुलच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करणाऱ्या शार्दुल ठाकूरने बॉलचा अंदाज घेत बॉण्ड्रीलाइनपासून अगदी काही इंच दूर हा चेंडू झेलला.
कॅच पकडल्यानंतर आपलं बॉडी बॅलेन्स जात असून आपण चेंडूसहीत बॉण्ड्री लाइन क्रॉस करुन आणि हा षटकार ठरवला जाईल असा विचार करत शार्दुलने पाय बॉण्ड्री लाइनच्या पलीकडे पडण्याआधीच तो पुन्हा मैदानामध्ये हवेत फेकला. त्यानंतर त्याने बॉण्ड्रीच्या पलिकडे पाऊल ठेवत आपला तोल संभाळला आणि पुन्हा मैदानात येत हवेत उडणारा चेंडू पकडला. रिव्ह्यूमध्ये शार्दुलने पकडलेला अप्रतिम झेल क्लिन असल्याचं सिद्ध झालं. रेहमानुल्ला 21 धावा करुन बाद झाला. संघाची धावसंख्या 63 वर असतानाच रेहमानुल्ला बाद झाला. शार्दुलवर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
1)
Terrific catch by Shardul Thakur....#INDvsAFG #INDvsPAK #WorldCup2023 pic.twitter.com/MHj7qOf2eC
— Hamid (@HaMidOwAiSi3) October 11, 2023
2)
Shardul thakur take amazing catch #INDvsAFG #shardulthakur #shami #AmitabhBachchan #raj pic.twitter.com/CckkRxnfCq
— Govind Vishwakarma (@GovindV41685093) October 11, 2023
3)
Shardul Thakur shows you why he is picked as All-Rounder pic.twitter.com/A24a7yjjQd
— Broken Cricket (@BrokenCricket) October 11, 2023
4)
WHAT A CATCH BY SHARDUL THAKUR.
- Lord Thakur Magic…!!!! pic.twitter.com/8O5M6JAXai
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 11, 2023
त्यानंतर गोलंदाजीसाठी शार्दुलला संधी देण्यात आली असता त्याने वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर रेहमत शाहला तंबूचा रस्ता दाखवला. शार्दुलच्या चेंडूचा अंदाज न आल्याने चेंडू थेट शाहच्या पॅडला लागला आणि तो पायचित झाला.
Lord Shardul Thakur Strikes!!!
#CWC23 | #INDvsAFG | pic.twitter.com/KZWMnUhin4
— (@balltamperrerrr) October 11, 2023
शाहने पंचांनी बाद दिल्याचा निर्णय घेतल्यानंतर रिव्ह्यू घेतला पण त्याचा फायदा झाला नाही.