चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
यावेळी चहलचा मैदानावर आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. लेग स्पिनर युझवेंद्र चहलच्या मते कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमकतेमुळेच मी अधिक आक्रमक बनलो.
पहिली वनडे जिंकल्यानंतर चहल म्हणाला, अनेकदा स्पिनर आक्रमक होतात. मात्र जेव्हा तुमचा कर्णधार इतका आक्रमक असेल तर तुम्हाला त्याबाबतचे अधिक स्वातंत्र्य मिळते. मात्र कधी कधी एक पाऊल मागेही जावे लागते आणि प्लान बदलावा लागतो. चहलसह पहिल्या वनडेत कुलदीपनेही चांगली कामगिरी केली.