तब्बल दीड तास वॉशिंग मशिनमध्ये अडकली चिमुकली!
अमेरिकेत एका कुटुंबातील ११ वर्षाची मुलगी घरातील मुलांबरोबर लपंडाव खेळत असताना वाशिंग मशीनमध्ये अडकली. मुलीला तब्बल ९० मिनिटांनंतर वाशिंग मशीनमधून बाहेर काढण्यात आलं.
Jan 5, 2014, 06:58 PM ISTअमेरिकेच्या आकाशात होणार ड्रोनची गर्दी
मानवरहित विमान ड्रोनचा जागतिक बाजार पुढील दशकात ८९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियमन बोर्डाने देशातील सहा राज्यात, ड्रोनच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी परिक्षण स्थळ निवडण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या आकाशात ड्रोन विमानांची ढगांसारखी गर्दी होणार आहे.
Jan 5, 2014, 06:05 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्यांवर एक नजर...थोडक्यात
दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाने भयानक रुप घेतलंय. तर बगदादमध्ये स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तसेच अमेरिकेत झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टी झाल्याचे दिसत आहे.
Dec 26, 2013, 01:11 PM ISTबॉबी जिंदाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत
मूळ भारतीय वंशाचे असलेले रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेते आणि लुसियाना प्रांताचे सद्य गव्हर्नर बॉबी जिंदाल २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत.
Dec 23, 2013, 06:48 PM ISTअमेरिकेकडून देवयानीचा अपमान, मुंबईत मनसे महिला रस्त्यावर
भारतीय दुतावासातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचा अमेरिकेत झालेल्या अपमानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा करण्यात आल्यात.
Dec 21, 2013, 04:37 PM ISTदेवयानीप्रकरणी अमेरिकेच्या कंपन्या टार्गेट, मुंबईत पिझ्झा पार्लरची तोडफोड
देवयानी खोब्रागडेंना वाईट वागणूक देणा-या अमेरिकन यंत्रणांवरचा राग आता अमेरिकन कंपन्यांवर निघू लागलाय. वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉमिनोजच्या पिझ्झा पार्लरमध्ये हंगामा करून तोडफोड केली. अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉमिनोजमध्ये धिंगाणी घातला.
Dec 20, 2013, 03:36 PM ISTदेवयानी प्रकरणः अमेरिकेचा अडेलतट्टूपणा कायम
न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तणुकीसंदर्भात अमेरिकेने माफी मागावी, तसेच त्यांच्यावर आरोप मागे घ्यावे या भारताच्या मागण्या फेटाळून लावल्या आहे. देवयानी यांना गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती.
Dec 20, 2013, 11:13 AM ISTदेवयानीप्रकरणी अमेरिकेची दिलगिरी, भारत अधिक आक्रमक
अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुलीला न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. तर भारताने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी माफी मागा, असे म्हटले आहे.
Dec 19, 2013, 06:35 PM ISTदेवयानी प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला खेद
न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना करण्यात आलेली अटक आणि देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीबाबत अमेरिकेनं अखेर माफी मागितलीय.
Dec 19, 2013, 09:19 AM ISTअमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल
अमेरिकेतील भारतीय दुतावास कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल भारतामध्ये संतापाची लाट उसळलीय. परंतु तरीही अमेरिकेचा उर्मटपणा अद्याप कमी झालेला नाही. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याऐवजी अमेरिकेने चक्क या कृत्याचं समर्थन केलंय.
Dec 18, 2013, 10:38 PM ISTदेवयानी खोब्रागडे यांची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली
अमेरिकेत अपमानित झालेल्या देवयानी खोब्रागडेंची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे त्यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
Dec 18, 2013, 06:04 PM ISTअमेरिकेच्या समलैंगिक अधिकाऱ्यांना भारतात अटक होणार?
भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत.
Dec 18, 2013, 11:02 AM ISTअमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ओळखपत्र परत करण्याचे आदेश
अमेरिकेच्या भारतीय राजनैतिक महिला अधिकाऱ्याला दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर भारतानं अमेरिकेला भारतात तैनात केलेल्या आपल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओळखपत्र परत करण्याचे आदेश दिलेत.
Dec 17, 2013, 02:30 PM ISTडॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी
भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.
Dec 17, 2013, 12:59 PM ISTहार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब
हारवर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.
Dec 17, 2013, 12:02 PM IST