बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.
Dec 5, 2013, 02:56 PM ISTएडवर्ड स्नोडेन दिल्लीतच शिकला कॉम्प्युटर हॅकिंग
अमेरिकेच्या ‘प्रिज्म’ या हेरगिरीची प्रकल्पाचा भंडाफोड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेननं कॉम्प्युटर हँकिंगचं तंत्रशुद्ध ज्ञान नवी दिल्लीतच घेतलंय. दिल्लीच्या कोइंग सोल्यूशन या इन्स्टिट्यूटमधून स्नोडेननं हे शिक्षण घेतलंय. या इन्स्टिट्यूटनंच ही माहिती प्रसिद्ध केलीय.
Dec 5, 2013, 11:49 AM ISTआता चंद्रावर फुलणार भाजीपाल्याचा मळा, नासाचे प्रयत्न!
अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचं नियोजन करत असून, २०१५ मध्ये तिथं भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Dec 4, 2013, 08:23 PM IST‘ह्युफिग्टंन पोस्ट’ची माघार... सोनियांचं नाव हटवलं
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बहुआकडी संपत्तीवरून वाद सुरू झालाय. दरम्यान, हे संपत्तीचे आकडे उघड करणाऱ्या ‘हफिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वेबसाइटनं या वादातून काढता पाय घेत सोनिया गांधींचं ‘डिलीट’ मारलंय. ‘हफिंग्टन पोस्ट’नं जाहीर केलेल्या श्रीमंत २० नेत्यांच्या यादीत आता मात्र सोनिया गांधींचं नाव दिसत नाही.
Dec 3, 2013, 03:21 PM ISTसोन्याच्या-चांदीच्या किंमती पुन्हा लुडकल्या!
सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळालीय. एमसीएक्समध्ये आज सकाळी सोनं प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी कोसळून २९,८५४ वर पोहचलं.
Nov 23, 2013, 07:47 PM ISTबिल गेट्स अमेरिकेतील सर्वात मोठा परोपकारी!
फोर्ब्सनं नुकतीच अमेरिकेतल्या ५० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केलीय. या यादीत नंबर १ वर आहे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा. अमेरिकेतील सर्वात मोठे समाजसेवी आणि देणगीदार हे दोघं ठरले आहेत.
Nov 20, 2013, 01:26 PM ISTजिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत
अमेरिकेतील पाकिस्तानचे नवे राजदूत म्हणून जलील अब्बास जिलानी यांची नियुक्ती केली गेली आहे. जिलानी यांच्याकडे याआधी परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी होती.
Nov 9, 2013, 05:17 PM ISTपाकनं धुडकावली होती ओबामांची `काश्मीर ऑफर`!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ साली गुप्तरित्या पाकिस्तानसमोर काश्मीरसंबंधी एक प्रस्ताव ठेवला होता.
Nov 6, 2013, 01:00 PM ISTअमेरिकेत मॉलमध्ये पुन्हा गोळीबार...
उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
Nov 5, 2013, 01:57 PM ISTअमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...
जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...
Nov 1, 2013, 10:35 PM ISTपहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!
अमेरिकेच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कॅपिटॉल हिल्सवर यंदा प्रथमच दिवाळीची आतषबाजी बघायला मिळाली. याबाबत अमेरिकन सिनेट आणि काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव एकमतानं संमत केल्या नंतर कॅपिटॉल हिल इथं पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम झाला.
Oct 31, 2013, 03:53 PM ISTअबब...अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती
सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Oct 26, 2013, 01:10 PM ISTमुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Oct 24, 2013, 02:49 PM ISTओबामा महिलेला आधार देतात तेव्हा…
पाहा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या लांबलचक भाषणाचा काय परिणाम झालाय तो... वॉशिंग्टनमध्ये हेल्थ केअरसंदर्भात बोलत असलेल्या ओबामांच्या भाषणादरम्यान एक महिला चक्कर येता येता वाचलीय.
Oct 22, 2013, 11:34 AM IST`काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी`, शरीफांची मागणी भारताला अमान्य
भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला काश्मीरप्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीनं सुटेल, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.
Oct 21, 2013, 08:26 AM IST