...हे आहे 'एडस्'चं गाव!
उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.
Jul 1, 2015, 07:59 PM ISTएड्सग्रस्त पतीच्या विधवेला गावकऱ्यांनी केलं बहिष्कृत
एचआयव्ही एड्सग्रस्त पतीच्या विधवा पत्नीला बहिष्कृत करण्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली इथं उघडकीस आली आहे.. गावात राहाण्यासाठी हक्काची जागा नसल्यानं सध्या या महिलेचं चक्क स्मशानभूमीत वास्तव करावं लागतंय.
Feb 4, 2015, 10:05 AM ISTकोल्हापूर : वाळीत टाकल्याने एड्सग्रस्त महिलेचे वास्तव्य स्मशानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:17 PM ISTगोवा राज्यात शंभरामागे एकाला एडस?
गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील प्रत्येक गावात एक तरी एचआयव्हीचा पेशंट आहे.
Aug 11, 2014, 08:34 PM ISTकंडोम कुठे मिळेल? जेव्हा तरुणी सगळ्यांना विचारते...
सध्या भारतामध्ये एड्स या भयंकर आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. एड्स होण्याची कारणं वेगवेगळी असली तर सर्वाधिक कारण म्हणजे असुरक्षित यौन संबंध हेच आहे. एड्सपासून वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कंडोमचा वापर...
Jul 13, 2014, 10:12 AM ISTएड्सबाधित विद्यार्थ्याला विद्यालय प्रवेश नाकारला
लातूरच्या औसा तालुक्यातल्या हासेगावमध्ये एका एड्सबाधित विद्यार्थ्याला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याची घटना उजेडात आलीय. कागदपत्रांची पूर्तता करुनही हा प्रवेश नाकारण्यात आल्यानं ‘आम्ही सेवक’ या संघटनेकडून या विद्यालयावर कारवाईची मागणी होतेय.
Dec 1, 2013, 06:20 PM ISTएड्सग्रस्तांचा पॉलिसीचा दावा मान्य होणार!
विमा पॉलिसी घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर `एचआयव्ही`ची बाधा झाली तरी त्या कारणावरून पॉलिसी संपल्यानंतर त्या व्यक्तीचा पॉलिसीच्या पैशांचा दावा अमान्य करू नये
Oct 14, 2013, 01:35 PM ISTएड्सने झाली अनाथ मुले, स्मशानात राहण्याची वेळ!
उत्तरप्रदेशातील प्रतापगडमध्ये चार निरागसमुलं गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानात राहात आहेत..त्या मुलांच्या पालकांचा एड्समुळे मृत्यू झालाय..त्यामुळे गावकर-यांनी या मुलांना गावाबाहेर काढलंय..त्यामुळेच त्यामुलांवर स्मशानभूमीत राहण्याची वेळ आलीय..
Jul 26, 2013, 10:50 PM IST`एचआयव्ही`ग्रस्तांचा अनोखा विवाह
अकोल्यातील सूर्योदय बालगृहातील `पूजा` आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा `भास्कर` विवाहबद्ध झालेयेत. आयुष्याची नवी सुरुवात करणारे हे दोघेही `एच. आय. व्ही. पोझीटीव्ह` आहेत.
May 5, 2013, 11:47 PM ISTएचआयव्हीवर औषध सापडलं
असाध्य रोग म्हणून एचआयव्हीची गणना होत होती. कारण या रोगावर आजवर औषध नव्हते. ज्या औषधांचा शोध लागला. मात्र, या औषधांची मात्रा लागू पडत नव्हती. एचआयव्हीवर इलाज होऊ शकतो, हे अमेरिकेतील डॉक्टरांनी सिद्ध केलंय. तसा दावा डॉक्टरांनी केला.
Mar 5, 2013, 12:13 PM ISTगायीचं दूध एचआयव्हीवर गुणकारी
एका नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की गायीच्या दूधापासून सहज एक असं क्रीम बनू शकतं, जे एचआयव्हीसारख्या घातक रोगापासून माणसाला वाचवू शकतं.
Oct 17, 2012, 04:07 PM IST