ई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!
शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.
Feb 1, 2015, 11:42 PM ISTतुमच्या आधार कार्डात 'ऑनलाईन' करा दुरुस्ती
तुमच्या आधारकार्डावर तुमच्या नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत काही चुका आढळल्यास तुम्हाला आता वैताग करून घ्यावा लागणार नाहीय... कारण, आता ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया होणार असल्यानं तुमचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.
Jan 20, 2015, 01:18 PM IST'ऑनलाईन गर्भपात' म्हणजे जीवाला घात!
इंटरनेट हे जर वरदान ठरतंय तसंच त्याचा चुकीचा वापर केल्यास ते शापही ठरतं... इंटरनेटमुळे सगळं जगचं तुमच्यासमोर एका क्लिकमध्ये उभं राहतं... तंत्रज्ञानात विकास होत असला तर सावधान राहणं गरजेचं आहे, असं डॉक्टर आवाहन करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली मुली लग्नापूर्वीच गर्भवती झाल्यानं यातून सुटका करून घेण्यासाठी त्या इंटरनेटवर गर्भपातासाठी औषधं शोधून घेतात... आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च गर्भपात करून घेतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे.
Dec 31, 2014, 05:45 PM ISTऑनलाईन गंड्यानं संपूर्ण कुटुंबालाच संपवलं!
भामट्यांनी घातलेल्या ऑनलाईन गंड्यानं एका संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करून टाकलंय. झालेल्या नुकसानीनं खचलेल्या एका कुटुंबानं आत्महत्या केलीय.
Dec 27, 2014, 02:01 PM ISTआता, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा ऑनलाईन फंड ट्रान्सफर!
रिझर्व्ह बँकेनं 'आरटीजीएस' प्रणालीच्या माध्यमातून कारभाराची वेळ वाढविण्यासंबंधी एक सर्क्युलर जाहीर केलंय.
Dec 16, 2014, 09:40 AM ISTईशारा... 2014 मध्ये होणार ‘ऑनलाईन मर्डर’!
काय??? मर्डर... आणि तोही ऑनलाईन??? कसं शक्य आहे हे??? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात एव्हाना भुंगा घालायला लागले असतील...
Oct 8, 2014, 07:45 PM IST‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद
सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2014, 08:17 AM ISTगुडन्यूज, भक्तांना मिळणार तिरुपती दर्शनाचे ऑनलाईन तिकीट
तिरुपती भक्तांसाठी एक गुडन्यूज आहे. तिरुपती देवस्थानाने प्रायोगिक तत्वावर बुधवारपासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू केली आहे.
Aug 20, 2014, 08:31 PM ISTIRCTCच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला बुक होणार 7200 तिकीट
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला तब्बल 7200 तिकीट बुक करता येणार आहे. कारण तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद झालीय.
Aug 14, 2014, 05:36 PM ISTगुड न्यूज: आता पासपोर्ट काढणं होणार आणखी सोप्प!
Jul 25, 2014, 09:26 AM ISTगुड न्यूज: आता पासपोर्ट काढणं होणार आणखी सोप्प!
आता पासपोर्ट काढणं आणखी सोपं होणार आहे... पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशनचा वेळ कमी लागावा यासाठी मुंबई पोलिसांनी 'पोलीस व्हेरिफिकेशन एसएमएस' ही नवी सुविधा सुरू केलीय.
Jul 24, 2014, 08:31 PM IST२ जूनला बारावीचा निकाल `ऑनलाईन`!
सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय.
May 29, 2014, 05:02 PM ISTमोदी, सनी लिऑनच्या नावे जात प्रमाणपत्राची मागणी
जात प्रमाणपत्राच्याबाबतीत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि पॉर्नस्टार सनी लिओन यांच्या नावाने चक्क ऑनलाईन अर्ज उत्तर प्रदेश प्रशासनाकडे आला आहे. या अर्जाने अधिकाऱ्यांना धक्काच बसलाय. बनावट अर्जाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
May 5, 2014, 04:27 PM ISTम्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणीला स्थगिती
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कारण, आजपासून म्हाडाच्य़ा मुंबई आणि विरारमधल्या 2441 घरांसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला स्थगिती देण्यात आलीय.
Apr 15, 2014, 11:34 PM IST`आयपीएल`च्या तिकीटांची ऑनलाईन विक्री उद्यापासून!
आयपीएलच्या सातव्या सत्रासाठीच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री येत्या गुरुवारपासून सुरु होतेय.
Apr 2, 2014, 06:59 PM IST