पुणे : शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.
जमीन व्यवहारांच्या नोंदींचे संगणीकीकरण करुन त्याचे ई-फेरफार उपलब्ध करुन देणारा भोर हा राज्यातला पहिला तालुका ठरलाय. या योजनेमुळे सरकारी बाबूंकडून होणारी अडवणूक थांबणार आहे.. त्याचप्रमाणे जमीन व्यवहारांच्या नोंदणी प्रक्रियेत पारदर्शीपणा येण्यास मदत होणार आहे.
ई-म्युटेशनद्वारे गाव नमुने, सातबारा, गाव नकाशे, फेरफार आदींच्या सही-शिक्क्यासहीत प्रती नागरिकांना घरबसल्या मिळू शकणार आहेत. त्यामुळे, यापुढे तलाठ्याकडे फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.