टीम इंडिया

पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय. 

Oct 9, 2014, 07:11 AM IST

विंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज

विंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आठ ऑक्टोबरपासून सुरु होणा-या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. इंग्लडविरोधात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

Oct 6, 2014, 12:08 PM IST

अश्विनला विश्रांती, कुलदीप यादवची टीम इंडियामध्ये एंट्री

आठ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी टीममध्ये अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला स्थान देण्यात आलंय. 

Oct 5, 2014, 08:40 AM IST

वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियामध्ये परतण्याची इच्छा – युसूफ

चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा विश्वास दर्शवत युसूफ पठाणनं सांगितलं की, वर्ल्डकप 2015च्या आधी आपलं महत्त्व सिद्ध करून टीम इंडियामध्ये परतायची इच्छा आहे. 

Sep 11, 2014, 04:11 PM IST

टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीचा नवा रेकॉर्ड!

इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिज आणि वनडे सीरिजमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं फक्त टी-20मध्ये कमाल दाखविली. भारतानं मॅच गमावली असली तरी कोहलीनं एक नवा रेकॉर्ड बनवलाय. 41 बॉल्समध्ये शानदार 66 रन्स करणारा कोहली टी-20मध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय ठरलाय. 

Sep 9, 2014, 08:40 AM IST

'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'

मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

Sep 2, 2014, 09:35 PM IST

टीम इंडियाची इंग्लंडवर 133 रन्सनं मात, सीरिजमध्ये आघाडी

भारत विरुद्द इंग्लंड दुसऱ्या वन डे मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतानं इंग्लंडवर 133 रन्सनं मात केलीय.

Aug 27, 2014, 11:16 PM IST

कोच आहेत टीमचे बॉस, धोनीकडून फ्लेचर यांची स्तुती

इंग्लंडमध्ये वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं कोच डंकन फ्लेचर यांची स्तुती केलीय. धोनीनं म्हटलं की, फ्लेचरच टीमचे बॉस आहेत आणि ते 2015 वर्ल्डकपपर्यंत टीमचे बॉसच असतील. 

Aug 25, 2014, 07:22 AM IST

झहीर खानचा टीम इंडियाला सल्ला, मोठी धावसंख्या हवी!

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये सपाटून मार खल्ल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होऊ लागली. आता तर फास्टर बॉलर झहीर खानने टीम इंडियातील खेळाडूंना सल्ला दिलाय. तुम्हाला जर जिंकायचे असेल तर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. तरच परदेशात तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकता, असे झहीर म्हणाला.

Aug 23, 2014, 04:39 PM IST

विराटच्या ‘प्यार के साइट इफेक्ट’ टीम इंडियावर

इंग्लंडमध्ये अपमानजनकरित्या पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने यावर मंथन सुरू केले आहे. मालिका सामन्यामध्ये 1-3 असा पराभव झालेल्या भारतीय संघाची सर्व बाजुंनी आलोचना होत आहे. स्लिपच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे निष्क्रिय ठरले. 

Aug 21, 2014, 06:34 PM IST

पराभवानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये बदल

टीम इंडियाच्या संचालकपदी रवी शास्त्री, तर माजी कसोटीवीर संजय बांगर आणि भारत अरूण यांना टीम इंडियाच्या सह प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्यात दारूण पराभव झाला, या पराभवानंतर हा बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Aug 19, 2014, 01:31 PM IST

भारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.  

Aug 18, 2014, 01:34 PM IST

धोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय. 

Aug 18, 2014, 01:12 PM IST

“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी

 मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. 

Aug 10, 2014, 08:01 AM IST

टीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?

भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.

Jul 27, 2014, 08:49 AM IST