नाशिक

अकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले

 येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.

May 5, 2015, 11:40 AM IST

नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा...

नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा...

May 2, 2015, 09:58 PM IST

नाशिक बलात्कार : आरोपी लष्करी अधिकाऱ्याच्या अटकेस टाळाटाळ!

लष्करी दलाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या देवळाली कँम्प परिसरात घडलीय. गतीमंद तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी लष्करातील कर्नलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मात्र, आरोपीला अजूनही अटक झालेली नाही. 

May 2, 2015, 08:17 PM IST

नाशकात गतिमंद मुलीवर लष्करी अधिकाऱ्याकडून बलात्कार

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यानं एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कर्नल विनोद सहानी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याला देवळाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

May 2, 2015, 05:13 PM IST

कंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन

कंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन

May 1, 2015, 10:05 PM IST

नाशिकचे मनसेचे नगरसेवक अधिकच गोंधळले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वॉर्डचा नाही तर शहराचा विचार करा, अशा सूचना केल्यानं नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत. तीन वर्षानंतर आता कुठे कामांना सुरवात होणार होती, त्यातच निधी मोठ्या प्रकल्पासाठी वर्ग करण्याच्या सूचना दिल्याने वॉर्डातील नागरिकांना काय उत्तर द्यायची, अशा विवंचनेत नगरसेवक आहेत.

Apr 29, 2015, 09:07 PM IST

येवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट

येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे. 

Apr 26, 2015, 10:55 AM IST