पाऊस

लातूरकरांसाठी १० वर्षांनंतर गुडन्यूज

शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणाचे ०६ दरवाजे पाव मीटरने उघडण्यात आले.  मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे. 

Sep 27, 2016, 10:49 AM IST

रायगडमध्ये पावसाची विश्रांती

आठवडाभर पावसानं झोडपल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतलीये. 

Sep 25, 2016, 10:12 AM IST

बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.

Sep 24, 2016, 10:38 PM IST

मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

Sep 24, 2016, 06:50 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक

राज्यात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असताना कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरही एकेरी वाहतूक सुरु आहे. 

Sep 24, 2016, 06:38 PM IST

परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील छोटी धरणं, तलाव, बंधारे, नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. यामुळे गोदाकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 24, 2016, 05:46 PM IST

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर

मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात पावसानं सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १०० पॉईंट ३८ टक्के इतका पाऊस झाला आहे.

Sep 24, 2016, 05:41 PM IST