राज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.
Jul 18, 2012, 05:40 PM ISTबेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव
बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.
Jul 12, 2012, 01:54 PM ISTअशोक चव्हाण समर्थकांची धाव प्रभारीपर्यंत
माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोट्याळ्यात आरोप ठेवण्यात आलेले अशोक चव्हाण यांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अशोक चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारलीय. त्यामुळं आता चव्हाण समर्थक आमदार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
Jul 11, 2012, 06:38 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडची साथ
अशोक चव्हाणांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारली आहे. अशोक चव्हाणांना एकटे पाडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अशोक चव्हाण समर्थक आमदार सोनियांकडे तक्रार करणार होते.
Jul 11, 2012, 01:22 PM ISTकाँग्रेस आमदारांकडूनच मुख्यमंत्र्यांवर शिंतोडे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आलीय. कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष अशोक चव्हाणांना एकटं पाडत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
Jul 10, 2012, 01:04 PM ISTअनधिकृत महाविद्यालयांवर होणार कारवाई
राज्यातल्या अनधिकृत डीएड आणि बीएड महाविद्यालयांविरोधात कारवाई होणार आहे. अनधिकृत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीतही प्राध्यान मिळणार नाही, असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
Jul 4, 2012, 07:22 PM ISTचव्हाणांसाठी 'चव्हाण'...
‘आदर्श घोटाळा प्रकरणात चौकशीची गरज नसल्याचं’ मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच आरोपपत्र दाखल केल्याबद्दलही त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर आदर्श प्रकरणात माझा काहीही संबंध नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Jul 4, 2012, 06:37 PM ISTपवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका
मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.
Jun 23, 2012, 07:46 AM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
Jun 22, 2012, 02:36 PM ISTअजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
Jun 22, 2012, 10:37 AM IST'शरद पवारांनी अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं'
उद्योगांच्या धोरणाबाबत टीका करण्याआधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं होतं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याबाबतची टीका गैरसमजातून होते आहे.असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
Jun 15, 2012, 10:09 PM ISTपवार-चव्हाणांमध्ये तू तू... मै मै
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय.
Jun 3, 2012, 08:43 AM IST