महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अपुरी, मुख्यमंत्र्यांची कबुली
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा अपुरी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रात या दिशेनं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
Dec 27, 2012, 05:58 PM ISTदादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.
Dec 23, 2012, 09:00 AM ISTमुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.
Dec 17, 2012, 03:59 PM ISTबाबा-दादांमध्ये पवारांच्या वाढदिवसाने ‘गोडवा’
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गोडवा वाढला तो बाबा आणि दादांमध्ये.
Dec 12, 2012, 05:28 PM ISTशिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही; मुख्यमंत्री नाराज
शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय.
Dec 10, 2012, 09:09 AM ISTअजित दादा बिनखात्याचे मंत्री!
कोणत्याही मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांच्याकडे अद्याप कोणती खाती देण्यात आलेली नाहीत.
Dec 9, 2012, 08:56 PM ISTफेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...
पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
Nov 28, 2012, 03:43 PM ISTआंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री
ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.
Nov 14, 2012, 10:11 AM ISTमुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना `दे धक्का`
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. राज्य सरकारनं पुणे महापालिकेला विश्वासात न घेता महापालिकेची हद्द वाढवली आहे. राज्य सरकारनं परस्पर २८ गावांचा समावेश महापालिका हद्दीत केलाय.
Oct 18, 2012, 07:40 PM ISTसुप्रियाताईंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री!
हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय.
Oct 16, 2012, 06:30 PM ISTदादा-बाबांच्यामध्ये दरी, फोन घेण्यास टाळाटाळ
अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.
Sep 26, 2012, 01:11 PM IST६४वा मराठवाडा मुक्तिदिन
आज 64 वा मराठवाडा मुक्तीदिन सोहळा साजरा कऱण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत हा सोहळा पार पडला. हैदराबादच्या निजामाच्या क्रूर राजवटीतून मुक्तीसाठी शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं.
Sep 17, 2012, 03:51 PM ISTशिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव
मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसर आणि निवासी भागाला हेरिटेज दर्जा देण्याप्रकरणी हेरीटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवाजी पार्क परिसर हेरिटेज झाल्यास त्याचा फटका या भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला बसणार आहे.
Sep 2, 2012, 11:33 AM ISTराज ठाकरे पुन्हा आक्रमक, सीएमच्या भेटीला
टोलवसुलीला तीव्र विरोध करत राज्यात आंदोलनाची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Aug 10, 2012, 04:40 PM ISTमुख्यमंत्री करतात फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामं!
मुख्यमंत्री फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामे करतात. त्यांनी कितीही कामे केल्याचा दावा केला, तरी समन्वय समितीच्या बैठकीत सर्व काही समोर येईल, असंही पिचड म्हणाले आहेत.
Jul 29, 2012, 09:47 PM IST