चेकऐवजी करा इलेक्टॉनिक पेमेंट...
चेकचा वापर कमी करा, असे आदेश अर्थ मंत्रालयानं सरकारी बँकांना दिले आहेत. चेकऐवजी ई-वितरणाचा वापर वाढवा, असे सरकारकडून लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय. यामुळे वितरणावर होणाऱ्या खर्चात कपात होणार आहे. चेक तयार करण्यासाठी आणि चेक वठवण्यासाठी बँका दरवर्षी आठ हजार कोटी रुपये खर्च करतायेत.
Jul 3, 2012, 11:23 PM ISTपैसे मोजण्यासाठी.. पैसे मोजा...
राष्ट्रीयकृत बँकांनी एक अफलातून निर्णय घेऊन ग्राहकांना दणका दिला आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक नोटा मोजण्यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र आपलेच पैसे मोजण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
Jan 9, 2012, 11:48 AM ISTइंदापूर अर्बन बँकेत सावळागोंधळ
इंदापूर अर्बन बँकेमध्ये राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतला सावळागोंधळ उघड झाला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना निधीत इंदापूरमधल्या एका शेतकऱ्याला घरदुरुस्तीचेकर्जमाफ करण्यात आलं आहे. चंद्रकांत चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
Jan 4, 2012, 06:25 PM ISTपुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या
धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
Nov 22, 2011, 01:53 PM IST