मोदींनी तोडला ओबामांचा रेकॉर्ड!
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आलेले नरेंद्र मोदी गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरलेत.
Sep 15, 2013, 09:44 AM ISTसीरियावर हल्ला करणं गरजेचं- ओबामा
अमेरिका सीरियावर हल्ला करणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. निरपराध लोकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर करून सीरियानं आंतरराष्ट्रीय कायदा मोडला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Sep 11, 2013, 08:50 AM ISTअमेरिका करणार सीरियावर हल्ला!
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
Sep 1, 2013, 10:31 AM ISTसीरियावर हल्ल्याचा अद्याप निर्णय नाही - ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियावर हल्ला करण्याचा मूड आता बदललाय. सीरिया सरकारनं २१ ऑगस्ट रोजी आपल्याच जनतेवर केलेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा परिणाम म्हणून दमिश्कवर हल्ला करण्याबद्दल आपण आत्तापर्यंत काहीही निर्णय घेतला नसल्याचं ओबामा यांनी म्हटलंय.
Aug 29, 2013, 03:19 PM ISTसीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.
Aug 28, 2013, 12:17 PM ISTपंतप्रधान डॉ. सिंग-बराक ओबामा यांची होणार भेट
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध वाढविण्याबाबत ते चर्चा करतील. २७ सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये ही भेट होणार आहे.
Aug 21, 2013, 03:17 PM ISTइजिप्त कारवाईचा बराक ओबामांनी केला निषेध
इजिप्तचे पदच्यूत अध्यक्ष मोहंमद मोर्सीसमर्थंकांवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हिंसक कारवाईचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी निषेध केलाय.
Aug 16, 2013, 03:46 PM ISTओबामांची व्हाइट हाउसमध्ये रंगली इफ्तार पार्टी
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. निमित्त होते ते रमजानचे. यावेळी खास पाहुण्यांचे स्वागत ओबामा यांनी केले.
Jul 27, 2013, 10:25 AM ISTमोदींना व्हिसा देऊ नका, खासदारांचे ओबामांना पत्र
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिसा कसा मिळणार नाही, याची मोर्चेबांधणी विरोधकांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील काही खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविले आहे. यावर या खादसारांच्या सह्या आहेत.
Jul 24, 2013, 03:58 PM ISTओबामांनी दिल्या नेल्सन मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्या!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेलांना ९५ व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
Jul 18, 2013, 02:55 PM ISTअमेरिकेत विमान दुर्घटना, २ ठार, १८० जखमी
दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं
Jul 7, 2013, 05:00 PM ISTआपल्या ‘हीरोच्या’ भेटीसाठी निघाले ओबामा
गेल्या कित्येक दिवसापासून मंडेला फुफ्फुसाच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये आहेत. आपल्या हीरोच्या भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. या भेटीसोबतच ते दक्षिण आफ्रिकेचा दौराही करणार आहेत.
Jun 29, 2013, 05:43 PM IST२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक
अमेरिकेच्या काही सर्वोच्च नियामक मंडळाने परदेशातून कायमचे वास्तव करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक बिल तयार केले आहे. हे विधेयक राष्ट्रध्यक्षाकडून संमत झाले तर २४ लाख भारतीयांसोबत १.१ करोड लोकांना अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होऊ शकते.
Jun 28, 2013, 04:35 PM ISTओबामांच्या शर्टाच्या कॉलरवर लिपस्टिक डाग!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात आपल्या शर्टाच्या कॉलरला लागलेल्या लिपस्टिकच्या डागावर सफाई दिली.
May 29, 2013, 03:43 PM ISTपाकिस्तानच्या निवडणुकीवर ओबामा खूश!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीवर खुश झाले आहेत.
May 13, 2013, 03:58 PM IST