www.24taas.com, झी मीडिया, प्रिटोरिया
गेल्या कित्येक दिवसापासून मंडेला फुफ्फुसाच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये आहेत. आपल्या हीरोच्या भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. या भेटीसोबतच ते दक्षिण आफ्रिकेचा दौराही करणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती नेल्सन मंडेला हे प्रिटोरियाच्या हॉस्पिटलमध्ये सध्या अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंडेला यांना फुफ्फुसाच्या आजारामुळे ८ जूनला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. येत्या १८ जुलैला ते ९४ वर्षांचे होतील. गेल्या २४ तासात दोन वेळा मेडिक्लिनिक हार्ट हॉस्पिटलमध्ये मंडेला यांची भेट घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जैकब जुमा यांनी गुरुवारी अशी माहिती दिली की, मंडेला यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या अस्थिर प्रकृतीमुळे जुमा यांनी मोझाम्बिकचा दौराही रद्द केला आहे.
बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर मंडेला यांची भेट घेतील असे ओबामांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन रोडेस यांनी सांगितले. ओबामांच्या मते नेल्सन मंडेला हे ‘जगातील हीरो’ आहेत.. मंडेला यांनी कारावासातील जास्तीत जास्त दिवस रोबेन द्वीप या बेटावर घालवलेत. त्याबेटालाही ओबामा भेट देणार आहेत.
या दौऱ्यात ओबामांसोबत त्यांचे कुटुंब, वरिष्ठ सल्लागार, आणि उद्योगप्रतिनिधींचे एक मंडळ असणार आहे. खरंतरं त्यांचा हा दुसरा दौरा आहे मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतरचा हा पहिलाच दौरा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.